Breaking News

Monthly Archives: November 2020

म्हसळ्यातील फर्निचर कारखान्याला आग

80 हजारांची सामग्री जळून खाक म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा-दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील सुमारे 80 हजार किमतीचे लाकडी सामान जळून खाक झाले. म्हसळा-दिघी रस्त्यावर नथुराम कदम यांचा विविध लाकडी वस्तू बनविण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात …

Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा

कर्जतच्या लोभेवाडी, ऐनाचीवाडीतील उच्चशिक्षित तरुणांचा उपक्रम कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी उच्च शिक्षित आदिवासी तरुणांनी लोभेवाडीमध्ये रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम सुरू केला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र असे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसल्याने …

Read More »

पनवेल महानगरपालिकेत विद्यार्थी दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका कार्यालयात उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शनिवारी (दि. 7) विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल मनपा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रमोद लांगी, पनवेल शिक्षण विभाग केंद्र समन्वयक अशपाक काझी, शाळा क्र.8 मुख्याध्यापिका अतुपमा …

Read More »

शेअर खरेदी आणि कमी जोखीम? शक्य आहे!

शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातली एक म्हणजे स्टॉक एक्स्चेंजच्या (ईटीएफ) निर्देशांकात गुंतवणूक. आठवड्याच्या शेवटास दिवाळी आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे नवीन संवत वर्षासाठी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »

भारतीय ग्राहकशक्तीचा विजय असो!

भारतीय ग्राहकशक्तीच्या ताकदीवर देशात पैसा फिरायला लागला आणि वातावरण बदलून गेले. भारतातील पैसा असाच फिरत राहिला आणि त्याचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू लागला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा उत्साह दीर्घकाळ टिकेल आणि वर्तमानातील आर्थिक संकटाच्या झळीची तीव्रता निश्चितच कमी होईल. अर्थचक्रासंबंधी सर्व आकडेवारी असे सांगू लागली आहे की भारत नावाचा हत्ती …

Read More »

सावधगिरी हवीच

गेले जवळपास पाच आठवडे देशातील कोरोना फैलावाची आकडेवारी खाली जाताना दिसते आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भात सातत्याने भीषण परिस्थिती अनुभवणार्‍या महाराष्ट्रातही अखेर चित्र काहिसे दिलासादायक होताना दिसते आहे. अर्थात परिस्थिती बदलत असली तरी कोरोना पूर्णत: गेलेला नाही हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे सावधगिरी सोडून चालणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र सुरूवातीपासूनच कोरोनाच्या फैलावात …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 141 नव्या कोरोना रुग्णांची व पाच जणांंच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 6) झाली, तर दिवसभरात 149 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 57 व ग्रामीण 16) तालुक्यातील 73, उरण 23, अलिबाग 12, पेण 10, रोहा सात, कर्जत सहा, माणगांव पाच, खालापूर चार, श्रीवर्धन …

Read More »

ठाकरे सरकारला सर्वोच्च झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …

Read More »

खोपटे-बांधपाडा येथील स्मशानभूमीच्या कामाचे भूमीपूजन

उरण : वार्ताहर ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीत पंचायत उपसभापती शुभांगी पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जण सुविधेसाठी विशेष अनुदानाने सन 2019-2020 अंतर्गत निधीमधून स्मशानभूमी बांधकाम करणे हे काम मंजूर करण्यात आले होते व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मशानभूमीचे शेड हा काही महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात …

Read More »

भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर

जिल्हा उपाध्यक्षपदी निलीमा भोसले यांची नियुक्ती महाड : प्रतिनिधी            भाजपची रायगड जिल्हा महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर झाली असुन भाजपचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कै. राजेय भोसले यांच्या पत्नी निलीमा राजेय भोसले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी ही कार्यकारिणी जाहिर केली. दरम्यान, …

Read More »