Breaking News

Monthly Archives: November 2020

काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून

मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम

ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्‍या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या …

Read More »

विना परवाना ज्वलनशील पदार्थाची विक्री करणारे ताब्यात

पनवेल : वार्ताहर विना परवाना ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या ताब्यात ठेवून सदर पदार्थ हा डिझेल असल्याचे सांगून काही कंटेनरचालकांना त्याची विक्री व साठा करणार्‍याविरूद्ध गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने तालुक्यातील पनवेल-शीळफाटा रोडलगत हिंदुस्थान विवेक ढाब्याशेजारी छापा टाकून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात उभ्या राहणार्‍या कंटेनर चालकांना …

Read More »

केळवणे येथे पोलीस आयुक्तांकडून सागरी सुरक्षा दल व मच्छिमारांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतीत आपटा फाटा ते केळवणे असा एकूण नऊ कि. मी.चा खाडी किनारा आहे. सदर खाडी किनारी डोलघर, कसारभाट, साई, दिघाटी, व केळवणे ही गावे आहेत. पोलीस ठाणे हद्दीत कासारभाट व केळवणे या दोन जेट्टी आहेत. या जेट्टीवरील सागरी सुरक्षा दल, ग्राम रक्षक …

Read More »

कळंबोलीत वृक्षांवर वारंवार विषप्रयोग

पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीत पनवेल ते सायन महामार्गालगत जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने चक्क झाडांवर विषप्रयोग केला जात आहे. एका पाठीमागून एक वृक्ष संपवण्याचे कारस्थान सुरूच आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. शेवटी आमच्यासाठी नव्हे किमान तुमच्यासाठी तरी आम्हाला वाचवा अशा …

Read More »

उरणमध्ये भाजपचा प्रशिक्षण वर्ग

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग; मान्यवरांकडून मार्गदर्शन उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्यावातीने मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग 28 आणि 29 नोव्हेबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उरण मंडलसाठी आयोजित वर्गाचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनंद पटवर्धन यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले असून, या …

Read More »

चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

पँगाँग भागात मरीन कमांडो तैनात नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर क्षेत्रात आपले मरीन कमांडो तैनात केले आहेत. लडाखमध्ये आधीपासूनच तैनात असलेल्या गरूड सैन्य संचलन आणि भारतीय सेनेच्या पॅरा स्पेशल दलाला अधिक मजबूत करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये मरीन कमांडो …

Read More »

ढगाळ हवामानाचा पर्यटनाला फटका

मुरूडमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधी – निवार चक्रीवादळ शुक्रवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास 25 किमी प्रतितास वेगाने मुरूड तालुक्यात धडकल्याने नागरिक भयभयीत झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता होती. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे सागरीकिनारी वसलेल्या मुरूडमध्ये शनिवारी …

Read More »

रायगडात 121 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त – रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 28) नवे 121 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 12) तालुक्यातील 103, अलिबाग सात, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, पेण व …

Read More »

शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी …

Read More »