Breaking News

Yearly Archives: 2020

रायगडात सलग तिसर्‍या वर्षी शेतीचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सलग तीन वर्षे जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सन 2018मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली होती. 2019-20मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 27 हजार हेक्टरवरील भातशेतीचे …

Read More »

खडसेंच्या प्रवेशावरून आघाडीतील आमदार नाराज

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, मात्र महाविकास आघाडीसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. आमदार पाटील हे मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या …

Read More »

पागोटेच्या उपसरपंच, सदस्यांसह शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे शेकाप उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 22) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण भाजप …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील कामांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून होणार्‍या विविध कामांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) गुरुवारी पाहणी केली. ही कामे वेळेत पूर्ण करा, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी अधिकार्‍यांना सूचित केले. कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोकडून केली जात असलेली कामे ही अत्यंत संथ गतीने …

Read More »

लेडिज स्पेशलचा मुहूर्त

नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारच्या सूचनेनुसार फक्त महिलांसाठी उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे शतश: आभार मानायला हवेत. कारण राज्य सरकारने निर्णय घेतल्यास उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती. परंतु याबाबत निर्णय घेण्यास अक्षम्य चालढकल करून राज्य सरकारने महिला वर्गाच्या सहनशीलतेचा अंत …

Read More »

मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो नाही; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : प्रतिनिधी मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राऊंडवर होते, पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो असे दौरे केले नाहीत, अशा शब्दांत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौर्‍यावरून टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपत

नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना, …

Read More »

पनवेल एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी राबविले विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी व त्याच्या सहकार्‍यांनी संस्था संचालित शाळेत शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले व त्यांना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अध्यक्ष इकबाल हसेन काझी यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य शाळांचे …

Read More »

वडखळ येथे स्वराज ट्रॅक्टरचे दालन सुरू

पेण : प्रतिनिधी पुण्यातील प्रसिद्ध कुदळे ग्रुप व सोनवणे ग्रुप यांच्या खेड व मावळनंतर आता पेण तालुक्यातील वडखळ येथे नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या दालनाचे उदघाट्न उद्योजक जितेंद्र माळी व महिंद्रा स्वराज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मंगेश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. वडखळ-पेण तसेच रायगडच्या ग्राहकांना हवे ते सर्व ट्रॅक्टर …

Read More »

रायगड जिल्ह्यात 184 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, बुधवारी (दि. 21) नव्या 184 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 244 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 117 व ग्रामीण 28) तालुक्यातील 145, अलिबाग 12, खालापूर, कर्जत व रोहा प्रत्येकी पाच, पेण …

Read More »