Breaking News

Yearly Archives: 2020

रायगडमधील नाते गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड; आमदार डावखरेंचे प्रयत्न

अलिबाग : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील नाते गावाची निवड झाली आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून एकमेव नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. …

Read More »

अविश्वास ठराव संमत थेट सरपंचांना ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा

मुरुड : प्रतिनिधी अविश्वास ठराव संमत झालेल्या सरपंचांना आता ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून, तेथेच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांच्यापैकी काही सरपंचांकडे पुरेसे ग्रामपंचायत सदस्य नाहीत. अशा थेट सरपंचावर अविश्वास ठराव दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही थेट जनतेमधून …

Read More »

गव्हाणमधील बचत गटांची ऑनलाइन नोंदणी

महिलांच्या सबलीकरणासाठी रत्नप्रभा घरत यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्तनवरात्रोत्सवात सर्वत्र देवीचा जागर होत असताना स्त्रीशक्तीच्या सबलीकरणासाठी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांनी पुढाकार घेत गव्हाणमधील महिला बचत गटांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली. त्यामुळे या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत पंचायत …

Read More »

बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा!

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल हिंगोली : प्रतिनिधीअतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी इतके अडचणीत आहेत, पण अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा …

Read More »

नंदुरबारमध्ये भीषण अपघात बस दरीत कोसळून पाच ठार, 35 जण जखमी

नंदुरबार : प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि 35 प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) मध्यरात्री घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अंकल ट्रॅव्हल्सची खासगी बस 40पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जळगावहून सुरतच्या दिशेने जात होती. ही बस सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रिटघर येथे टॅबचे वितरण, रयत टिंकरींग लॅबचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक टॅब वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना व …

Read More »

पेण पालिकेतील राजकीय हस्तक्षेपाविरोधात भाजप आमदार आक्रमक

संबंधित अधिकार्‍यांवर हक्कभंगाचा ठराव आणणार पेण : प्रतिनिधीपेण नगर परिषदेतील मुख्याधिकारी व गटनेते यांच्यातील वादात राजकीय हस्तक्षेप होत असून यामागे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील …

Read More »

दसर्‍याआधीच केंद्र सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचार्‍यांसाठी खूशखबर दिली आहे. त्यांच्यासाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20मधील बोनस मंजूर केला आहे. हा बोनस 3,737 कोटी …

Read More »

नियोजित पोलीस चौकीच्या ठिकाणी थाटले दुकान

कर्जत : बातमीदार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीने कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ गावाच्या नाक्यावर पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापावचे दुकान थाटण्यात आले आहे. दरम्यान, डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू असल्याचे पत्र 2018 मध्ये नेरळ पोलीस ठाण्याला देणारी उमरोली …

Read More »

अलिबागेत शहीद पोलिसांना अभिवादन

अलिबाग : प्रतिनिधी देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलनही झाले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी …

Read More »