Breaking News

Yearly Archives: 2020

गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाहीत त्यामुळे गोरगरिबांना आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे लिओ क्लब ऑफ नवी मुंबई एपीएमसीच्या माध्यमातून गोरगरिबांना फेस मास्क, सॅनिटायझर, डेटॉल लिक्विड, डेटॉल सोप आदी सामानाचे वाटप करण्यात आले. या वेळी क्लबचे …

Read More »

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा चारशेपार; 150 पोलीस कोरोनामुक्त

पनवेल : बातमीदार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 405 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच वेळी त्यांच्या 225 त्यांच्या नातेवाइकांनाही लागण झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, बाधित पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रात रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने नव्याने आढळलेल्या बाधितांना अन्यत्र दाखल केले …

Read More »

तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचार्यांना लागण

खोपोली ः बातमीदार – खालापूर तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात  सापडल्याने इतर कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत. शनिवारी महसूल दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर आणि कर्मचार्‍यांच्या अँटीजन तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती. 41 कर्मचार्‍यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन …

Read More »

महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबिर

पेण ः प्रतिनिधी – पेण उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी रक्तदान शिबिर आणि अँटीजन टेस्ट करण्यात आली. रक्तदान शिबिरात 28 जणांनी रक्तदान केले, तर उपस्थितांपैकी 74 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  रोहा येथील नायब तहसीलदार नागावकर यांचे कोरोनामुळे …

Read More »

किसान क्रांती संघटनेचा बागायतदारांना पाठिंबा

मुरूड ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांच्या नारळ-सुपारीला अल्प भाव दिल्याने मुरूड येथील संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला आता किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा पाठिंबा दिल्याने हे आंदोलन व्यापक होणार आहे. किसान क्रांती संघटनेचे लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव सदस्य असून होणारे आंदोलन विराट स्वरूपात …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर, टेक्निशियन दाखल

पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या फार कमी असल्याने त्यासाठी तरतूद व्हावी तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा आडमुठेपणा व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली होती. या …

Read More »

पर्यटकांवर करडी नजर

पोलिसांचा खडा पहारा; वर्षा सहलींचे बेत फ सले कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील पाणवठे तसेच इतर पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येदेखील काही हौशी तरुण-तरुणी माथेरानच्या डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येत होते, मात्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून येथे चोख बंदोबस्त …

Read More »

आम्ही मागून वार करत नाही

शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले अलिबाग : प्रतिनिधीकाही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन …

Read More »

दूध दरवाढीसाठी भाजपचा एल्गार

राज्यव्यापी आंदोलनाला सहकारी पक्षांचीही साथ कोल्हापूर : प्रतिनिधीदूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शनिवारी (दि. 1) राज्यव्यापी दूध बंद केले. या आंदोलनाचे राज्यात पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको केला गेला, तर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक घालून निषेध करण्यात आला.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी …

Read More »

पनवेल तालुक्यात 180 नवे कोरोनाग्रस्त

चार जणांचा मृत्यू; 191 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 1) कोरोनाचे 180 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 143 रुग्ण …

Read More »