Breaking News

Yearly Archives: 2020

काकडी विक्रीला लॉकडाऊनचा फटका

शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्‍यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्‍यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक  उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा …

Read More »

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या  रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये …

Read More »

कर्जतमध्ये चार ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार असून, त्यातील एका ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण …

Read More »

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग

24 तासांत तब्बल 34,884 नवे रुग्ण; 671 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 884 नव्या रुणांची नोंद झाली असून, 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 22 हजार 942 रुग्ण बरे झाले. …

Read More »

कोरोनापासून बचावासाठी काळी मिरी, रम आणि अंडी!

मंगळुरू : वृत्तसंस्था जगभरात कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. विविध देशांतील वैज्ञानिक कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, कोरोनावरील लस येण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कर्नाटकातील उल्लाल नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकाने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी रम, काळीमिरी आणि अंड्यांचे सेवन करण्याचा अजब उपाय सुचविला आहे. हा …

Read More »

‘सरकारमध्ये काँग्रेसला विचारतोय कोण?’

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर या …

Read More »

राज्यात दिशा कायदा कधी अंमलात येणार?

क्वारंटाइन सेंटरमधील बलात्कारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल पनवेल : प्रतिनिधीकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाइन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केला ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, त्यामुळे कोरोनो सेंटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीसोबतच येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे रक्षक …

Read More »

रायगड जिल्ह्यात 351 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 351 रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 18) झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 183 (महापालिका 125 व ग्रामीण 58), खालापूर 45, अलिबाग 35, पेण 32, उरण 29, महाड 16, कर्जत नऊ आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत …

Read More »

तळोजा सबवे सुरू करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1ला जोडणार्‍या सबवेमध्ये साचणार्‍या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, तळोजा फेज 1ला जोडण्यासाठी …

Read More »

रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल

दुकानांना पाच तासांची मुभा अलिबाग : प्रतिनिधीपनवेलपाठोपाठ उर्वरित रायगड जिल्ह्यातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित वेळेपुरती सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. …

Read More »