Breaking News

Yearly Archives: 2020

राज्य सरकार कोरोनावरून लक्ष विचलित करतेय : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी विरोधक हे सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करीत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. …

Read More »

रायगडात तब्बल 432 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक 432 रुग्णांची रविवारी (दि. 12) नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 194 (महापालिका हद्द 154, ग्रामीण 40), पेण  67, अलिबाग 37, रोहा 27, खालापूर 25, माणगाव 21, म्हसळा 15, कर्जत …

Read More »

सरसगडावर राबविली वृक्षारोपण मोहीम; शिवऋण प्रतिष्ठान व सुधागड वनविभागाचा स्तुत्य उपक्रम

पाली ः प्रतिनिधी शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र व वनविभाग सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) पालीतील सरसगड किल्ल्यावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या वेळी तब्बल 60हून अधिक देशी व उपयोगी झाडांची लागवड करण्यात आली. शिवऋण प्रतिष्ठानने आपल्या कृतिशील कार्यातून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण ही …

Read More »

रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने रोहेकरांची चिंता वाढली आहे. रोहा तालुक्यात रविवारी (दि. 12) 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. शहरात आठ व ग्रामीण भागात 19 असे एकूण 27 कोरोनाबाधित …

Read More »

डॉ. चेतन म्हात्रे यांची पुनर्नियुक्ती

नागोठणे : प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा 29 जून रोजी केंद्रातील सेवेचा करार संपुष्टात आला होता. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट सेवा बजावत असतानाच त्यांचा करार संपल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र एका चांगल्या डॉक्टरला मुकणार असे वाटत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. चेतन म्हात्रे यांची वैद्यकीय अधिकारी गट …

Read More »

गरूडझेप फाऊंडेशनचे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण

रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 63 गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षण मिळावे म्हणून अभ्यासिका उपलब्ध करून देऊन गरूडझेप फाऊंडेशनने समाजकार्याचे एक आगळेवेगळे पाऊल टाकले आहे. रोह्यापासून 25 किमी अंतर असलेल्या दुर्गम भागातील शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जूनला नवीन …

Read More »

माणगावात 21 नवे कोरोनाग्रस्त

माणगाव ः प्रतिनिधी    माणगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेचीही चिंता वाढली आहे. तालुक्यातील माणगाव येथील 10, मोर्बा गावातील सहा, ढालघर फाटा येथील एक तसेच इंदापूर येथील चार अशा एकूण 21 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच नऊ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे …

Read More »

डिकसळ शांतीनगर भागात कचर्‍याचे साम्राज्य; घंटागाडी गायब; दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण

कर्जत ः बातमीदार कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. स्वच्छता व सामाजिक अंतर राखून या विषाणूला रोखता येऊ शकते, मात्र कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत याउलट चित्र दिसत आहे. अनेक दिवसांपासून डिकसळ शांतीनगर येथे कचर्‍याचा ढीग पडला आहे परंतु घंटागाडी गायब …

Read More »

गावांनाही कोरोनाचा विळखा; निष्काळजीपणामुळे वाढला संसर्ग

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाने आता रायगड जिल्ह्यातील गावागावांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत होणारी वाढ बाहेरून आलेल्यांमुळेच अधिक झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. काही रुग्ण हे केवळ निष्काळजीपणामुळे बाधित झाले आहेत. मला काय होतंय? या अतिहुशारीने त्यांना कोरोनाचा संसर्ग …

Read More »

भेंड झाड नामशेष होण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी – कौले जाऊन घरावर सिमेंटपत्रे व सुरूचे वासे लावायला सुरुवात झाल्यावर भेंड (भेंडी) हे अनेक वापरात येणारे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भेंड हे हिरवे गार सरळसोट व अनेक फांद्यांनी बहरून तयार असलेले झाड दिसायचे. गावचा शेतकरी आपल्या बैलगाडी साठी धुरंडी म्हणून …

Read More »