पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरूच्चार; संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या प्रगतीसाठी ’वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि. 25) अखिल भारतीय पीठासीन अधिकार्यांच्या संमेलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ’वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे …
Read More »Yearly Archives: 2020
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
अलिबाग : जिमाका – संविधान दिनानिमीत्त अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अधिकारी कर्मचार्यांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह …
Read More »वाढीव वीज बिले माफ करा!
विविध प्रांत कार्यालयांवर मनसेची धडक कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे आणि वीज बिलात युनिटमध्ये जी सूट देण्याची घोषणा केली होती तो शब्द पाळावा, या मागणीसाठी कर्जत आणि खालापूर तालुका मनसेच्या वतीने गुरूवारी (दि. 26) कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य शासनाने …
Read More »26/11च्या हल्ल्यातील शहिदांना पनवेल पोलिसांकडून आदरांजली
पनवेल : वार्ताहर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली गुरुवारी (दि. 26) पनवेल शहर पोलिसांनी वाहिली. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम …
Read More »नवीन पनवेलमधील समस्यांबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना इशारा
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधील समस्यांबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी पत्र देऊन लोकांचे हिताची व त्याचे जीवितावर बेतणारी कामे 15 डिसेंबर पुर्वी करावीत अन्यथा आपल्या नवीन पनवेल कार्यालयाविरुद्ध मोर्चा अथवा धरणे धरावे लागेल, असा इशारा देताना कोविड-19च्या महामारीच्या काळात त्याची पुर्ण जबाबदारी आपले कार्यालयाची व …
Read More »भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षपदी अविनाश गायकवाड
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) अध्यक्षपदी विचुंबे येथील अविनाश सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित प्रशिक्षण वर्गादरम्यान गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …
Read More »वीज बिल कमी करण्यासाठी राज्य सरकारविरोधात मनसेचा मोर्चा
मोहोपाडा : प्रतिनिधी गेले आठ महिने जनता लॉकडाऊनमुळे घरीच अडकलेली असताना आणि आमदनी रूपयाचीही कमाई नसताना राज्य सरकारने लोकांना लॉकडाऊन काळात आलेल्या विज बीलात कोणतीही सवलत मिळणार नाही हे जाहीर केले आणि महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला. लॉकडाऊन काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरणार्या मनसेने याविरोधात एल्गार पुकारला आणि 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातल्या …
Read More »कोन गावच्या हद्दीत एसटी बसचा भीषण अपघात
एक ठार; 13 गंभीर जखमी पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कोन गावच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत किमी 9.6 वर मध्यरात्रीच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला असून एका या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबई सह एमजीएम कामोठे रुग्णालयात …
Read More »नियमांचे पालन न केल्याने पनवेलमध्ये कोरोना रुग्णांत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बुधवारी एकाच दिवशी 119 रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या दिवसाला शंभपर्यंत पोहचत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने खाटांचे नियोजन सुरू केले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक अडीचशे कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर प्रमाण …
Read More »लसीच्या प्रतीक्षेत विश्व
कोरोना विषाणूला अटकाव करणारी प्रभावी लस आता आपल्याला प्रत्यक्षात दिली कधी जाते याकडे अवघे जग तूर्तास डोळे लावून बसले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी याबाबतदेखील जगाचा हिरमोड केलेला नाही. कोरोना विषाणूची पहिली केस चीनमध्ये साधारण वर्षभरापूर्वी आढळली. त्यानंतर जवळपास 12-13 महिन्यांच्या आत जगभरातील किमान तीन डझन लशी यशस्वी वाटचाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper