Breaking News

Yearly Archives: 2020

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

पनवेल ः बातमीदार : रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्यु. कॉलेज वावंजे, ता. पनवेल येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला. विद्यालयाचे चेअरमन जी. आर. पाटील यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात केली. जी. आर. पाटील यांनी …

Read More »

आरटीओसमोरील पार्किंगमधील गाडीला आग

पनवेल ः वार्ताहर : पनवेल आरटीओसमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सेलेरिओ गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 17) घडली. यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल आरटीओ कार्यालयासमोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केटकडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ …

Read More »

सायकल प्रवासातून पर्यावरणविषयक जनजागृती

मोहोपाडा ः प्रतिनिधी : रिस येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे यांचे चिरंजीव शुभम शिंदे व पुणे येथून अक्षय गायकवाड याने 13 दिवसांत रसायनी ते कन्याकुमारी हा 1700 किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास पूर्ण केला. या वेळी दोघांनी चार राज्ये, 15हून अधिक मोठी शहरे, शंभरहून अधिक गावे, त्यामध्ये भाषेची अडचण असा …

Read More »

खारघरमध्ये सांस्कृतिक भवन व ग्रंथालय निर्मितीसंदर्भात निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त : खारघर सेक्टर 8मधील भूखंड क्रमांक 9वर पनवेल महानगरपालिकेच्या राखीव असलेल्या मागासवर्गीय निधीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व ग्रंथालयाची निर्मिती करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांना सोमवारी (दि. 17) निवेदन देण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या जागेवर भव्य वास्तू उभारून सभागृह व ग्रंथालयाची निर्मिती …

Read More »

खारघर-मुंब्रा नवा मार्ग; पनवेल महापालिकेचा पुढाकार

पनवेल ः बातमीदार  : खारघरमधील सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पांजवळील रोंहिजण गावाजवळून थेट पनवेल-मुंब्रा महामार्ग गाठणे आता सोपे होणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून 10 कोटी रुपये खर्च करून नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. खारघर सेक्टर 36, 37, 38 आदी भागांतून मुंब्रा, कल्याण, ठाणे या भागाकडे जाण्यासाठी खारघरमधून एकमेव रस्ता आहे. …

Read More »

अनैसर्गिक सरकार टिकणार नाही

जे. पी. नड्डा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल नवी मुंबई : बातमीदारमहाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे, मात्र हे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर रविवारी (दि. 16) जोरदार हल्लाबोल केला. ते पक्षाच्या …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील गव्हाण ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 15) आयोजन करण्यात आल होते. हा समारंभ शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.गव्हाण येथे आयोजित या हळदी-कुंकू  समारंभात अ‍ॅड. दीपाली बांद्रे यांचे महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान …

Read More »

स्वस्तिकाची चमकदार कामगिरी

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेली टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम 2020 या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विविध क्रीडा प्रकार असलेल्या …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सर्वांनी योगदान द्यावे : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : वार्ताहररयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत असून, मार्च 2020मध्ये सुवर्ण महोत्सवी सोहळा होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक व दानशूर व्यक्तींनी यात सहभाग घेऊन योगदान देणे आवश्यक असल्याचे महाविद्यालय विकास समिती चेअरमन, माजी …

Read More »

‘सीएए’ समर्थनार्थ नेरळमध्ये भव्य रॅली

कर्जत : बातमीदारनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या (सीएए) समर्थनार्थ नेरळमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक जागरण मंच यांच्या वतीने रविवारी (दि. 16) भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तिरंगा झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते आणि भगव्या टोप्या परिधान केलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, …

Read More »