नागोठणे : प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या भेकराला दोन स्थानिक तरुणांनी जीवदान दिल्याची घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावात घडली. नागोठणे विभागाच्या वन कर्मचार्यांनी या भेकरीला घनदाट जंगलात सोडून दिले. कुंभारशेत गावातील विहिरीत शनिवारी सायंकाळी एक भेकर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दोन स्थानिक तरुणांनी तातडीने भेकराला विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांनी …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल तालुक्यात क्रिकेट स्पर्धांची धूम
पनवेल : रामप्रहर वृत्तविहिघर येथे ओम साई दोस्ती क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2020 आणि कुंडेवहाळ येथे निकेश वास्कर स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे उरण, पनवेल आमदार चषक आणि सरपंच चषक 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष …
Read More »चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेत पुरस्कार
कर्जत : बातमीदार पेस्टल जर्नल हे चित्रकलेच्या जगतातील अत्यंत प्रसिद्ध असे मॅगझिन अमेरिकेतून प्रसिद्ध होते. त्या मासिकात कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. पेस्टल माध्यमातील या चित्राला अमेरिकेत पुरस्कार जाहीर झाला आहे. पेस्टल जर्नल हे चित्रकलेवर आधारित पुस्तक गेल्या 21 वर्षापासून प्रकाशित होत आहे. …
Read More »झारखंडच्या पुंडीची प्रशिक्षणासाठी निवड
रांची : वृत्तसंस्थाझारखंडच्या नक्षलग्रस्त भागातील आणि गरीब कुटुंबातील पुंडी सारु या मुलीने सर्व अडचणींवर मात करीत हॉकीपटू बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं आहे. अमेरिकन दुतावास आणि शक्तिवाहिनी या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यातील 107 मुलींमधून पाच जणींची अमेरिकत प्रशिक्षणासाठी निवड …
Read More »‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पनवेल ः प्रतिनिधी : खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सोमवारी (दि. 17) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे व्हाइस चान्सलर ए. बी. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सीकेटी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून …
Read More »तिसर्या सामन्यातही धावांची बरसात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका इंग्लंडने जिंकली सेंच्युरियन : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा ट्वेन्टी-20 सामनादेखील थरारक झाला. प्रथम फलंदाजी करीत आफ्रिकेने इंग्लडसमोर 223 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने कर्णधार इयान मॉर्गनच्या वादळी खेळीच्या जोरावर पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकाही 2-1ने जिंकली. मॉर्गनच सामनावीर आणि मालिकावीर …
Read More »सामना होण्याआधीच मुंबईची चेन्नईवर सरशी
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगूल अखेरीस वाजले असून, गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबईने विक्रमी कामगिरी करीत चेन्नईला मागे टाकले आहे. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ ठरणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स …
Read More »भारताविरुद्ध बोल्टचे पुनरागमन
न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर; जेमिन्सनला संधी, सॅन्टनरला वगळले वेलिंग्टन : वृत्तसंस्थाभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-20 आणि वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यजमानांच्या संघात वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने …
Read More »वाशिवलीत श्री विरेश्वर मंदिराची स्थापना
मोहोपाडा ः प्रतिनिधी : वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालयाजवळील पाताळगंगा नदीकिनारी श्री विरेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे काम 12 वर्षांनंतर पूर्णत्वास आले आहे. या मंदिरातील शिवलिंग, नंदी, पार्वती, गणपती, विष्णू, लक्ष्मी, नाग, गोमुख, कासव व बारा ज्योतिर्लिंग भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाशिवलीतील ग्रामस्थांनी पाताळगंगा नदीकिनारी श्री …
Read More »हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
उरण : वार्ताहर : भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी (दि. 15) दुपारी 3 वाजता पिरकोन येथील श्री एकवीरा देवी मंदिर, देना बँकेजवळ हळदी-कुंकू समारंभ (महिला सक्षमीकरण) आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नीता महेश बालदी यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ झाला. कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद गावंड, भार्गव म्हात्रे, नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper