करोना हा विषाणू प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो. त्यामुळे ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास, तसेच फुप्फुसामध्ये संसर्ग अशी लक्षणे आढळून येतात. सौम्य लागण झाली असल्यास फ्लु किंवा सर्दीसारखीच लक्षणे दिसू शकतात. विषाणूची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यास दोनएक आठवड्यांचा काळही लागू शकतो. अशा वेगाने पसरणार्या विषाणूच्या संदर्भात घबराटीऐवजी जागरूकता व दक्षता बाळगल्यास …
Read More »Yearly Archives: 2020
फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते
कोपर-गव्हाण (ता. पनवेल) : जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती सेस फंडातून दोन लाखांचा निधी वापरून वर्गाला फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपर शाळेचे चेअरमन अनंतशेठ ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य माई भोईर, सुनीता घरत, योगिता भगत, ग्रामविकास अधिकारी …
Read More »दिघाटीत श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती. नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त दिघाटी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, …
Read More »‘शिवजयंती रात्री 12 वाजेपर्यंत साजरी करण्याची परवानगी द्यावी’
पनवेल : वार्ताहर येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, शिवजयंती साजरी करीत असताना शोभायात्रा …
Read More »प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमलता भगत, …
Read More »उरण येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
पनवेल : बातमीदार राज्य शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (दि. 30) उरण येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता ऑल …
Read More »दोन गजलसंग्रहांचे प्रकाशन
पनवेल : वार्ताहर येथील गजल ग्रुपच्या वतीने नुकतेच दिवाकर वैशंपायन यांचे ‘अमृत मंथन’, तसेच डॉ. अविनाश पाटील यांचे ‘माहौल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख उपस्थित होते. त्याचबरोबर कोमसापचे दत्तात्रेय सैतवडेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी …
Read More »पनवेलमधील शिवभोजन सार्वजनिक ठिकाणांपासून दूर
पनवेल : बातमीदार ठाकरे सरकारतर्फे 10 रुपयांत मिळणार्या शिवभोजनाचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात आला. पनवेल तालुक्यात दोन ठिकाणी ही थाळी सुरू करण्यात आली आहे. पनवेल आणि कळंबोली येथे शिवभोजन केंद्र उभारण्यात आली आहेत, मात्र ही केंद्र सार्वजनिक ठिकाणांपासून दूर आहेत. नव्या सरकारने शिवभोजन योजना जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणि …
Read More »चिरनेरच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी
माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा उरण : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 28) चिरनेर येथील महागणपती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगेचा ओघ वाढला होता. अगदी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंतसुद्धा भाविकांच्या गर्दीने मंदिराचा सभामंडप गजबजून गेला होता. पेशवेकालीन गणपती आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रचिती असलेल्या चिरनेर महागणपती मंदिरात …
Read More »भिंगारवाडी (ता. पनवेल) : भाजप युवा मोर्चा पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष व माजी सरपंच योगेश लहाने यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्घाटन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, जि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper