मोहोपाडा : प्रतिनिधी सामान्य जनतेबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविताना शासकीय मदतीबरोबर मी व्यक्तीगत देखील देखभाल करीन, असे आश्वासन उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक संस्था चौक यांच्यावतीने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सत्काराचे आयोजन शनिवारी (दि. 18) ज्येष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार बालदी बोलत होते. …
Read More »Yearly Archives: 2020
चांगल्या योजनांना ब्रेक लावणारे सरकार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची आघाडी सरकारवर टीका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये …
Read More »नागोठण्यात नेत्रचिकित्सा शिबिरास प्रतिसाद
नागोठणे : प्रतिनिधी शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 17) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर चालणार्या वाहनांच्या चालकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी 25 वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. नागोठणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, नेत्रचिकित्सा अधिकारी …
Read More »कर्जतमध्ये रस्ता सुरक्षा अभियान
कर्जत : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रस्ता अपघातात सापडलेल्यांना तातडीने मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक गजानन ठोंबरे यांनी कर्जत येथे केले. कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर …
Read More »केळवली-बीडखुर्द मार्गाची चाळण
प्रवास करणे बनले कठीण; खड्ड्यांतून मार्गक्रमण जिकिरीचे खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच खालापुरातील केळवली रेल्वे स्टेशन ते बीडखुर्द हा मार्ग जणू खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवासीवर्गाला …
Read More »गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान
नेरळजवळील विकटगड म्हणजे पेब किल्ल्यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेला किळसवाणा प्रकार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी साम्राज्यातील गडकोट आता अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिले आहेत. त्या गडकोटांचे संवर्धन राखण्याची कामे शासनाने आणि स्वयंसेवी संस्था यांनी सुरू केलेली आहेत, पण या सर्व गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान सर्वांत मोठे आहे …
Read More »चावणे, मोहोत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात विविध ठिकाणी आमदार चषक 2020 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत चावणे आणि मोहो येथे सामने रंगत आहेत. या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली.पनवेल तालुक्यातील चावणे येथील मैदानावर न्यू स्टार व जय हनुमान क्रिकेट …
Read More »चौक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधीइंडियन फेडरेशन अॅण्ड स्पोर्ट्स आयोजित दुसर्या आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार्या चौक येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी अग्रस्थान कायम ठेवले आहे. एकूण चार सुवर्ण व दोन रौप्यपदके पटकावून त्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.थाळीफेकमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या रुद्र भगत याने, 17 वर्षांखालील …
Read More »भारताची नेदरलँडवर दणदणीत सलामी
भुवनेश्वर : वृत्तसंस्थाहॉकी प्रो-लीग स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणार्या भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. जागतिक स्पर्धेत तिसर्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला भारताने पहिल्याच सामन्यात 5-2ने हरवले. भारतीय संघाने केलेल्या आक्रमक खेळापुढे नेदरलँडची डाळ शिजू शकली नाही.पहिल्याच मिनिटाला गुरजंत सिंहने मैदानी गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर ललित उपाध्यायने नेदरलँडच्या …
Read More »जय बजरंग! पुनियाने नववर्षातील पहिल्याच स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
रोम : वृत्तसेवाभारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने रोम मालिका क्रमवारीत 65 किलो फ्री स्टाइल वर्गात सुवर्णपदक जिंकले. 2020च्या पहिल्याच स्पर्धेत बजरंगने या पदकासह दणक्यात सुरुवात केली. त्याच्यासह रवी दहीयानेही 61 किलो वजनी गटात खेळताना सुवर्णपदक जिंकले.बजरंगने अंतिम फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ओलीचा 4-3ने पराभव केला. या स्पर्धेत महिला गटात विनेश फोगाटने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper