पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती …
Read More »Monthly Archives: January 2021
राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकर्यांचे नुकसान; रावसाहेब दानवे यांनी केली टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणार्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी …
Read More »फाफडा पॉलिटिक्स
येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून मुंबईतील मराठी माणूस सोडाच गुजराती बांधवांसदेखील हसू …
Read More »माणगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिक्षकाला अटक
माणगाव : प्रतिनिधीअल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून बदनामी करणार्या एका शिक्षकाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मदन प्रल्हाद वानखेडे याने सन 2016पासून 5 जानेवारी 2021पर्यंत त्याच्याच इमारतीत राहणार्या मुलीला तिच्या आईची नोकरी …
Read More »लॉकडाऊनमुळे मुरूड पालिकेचे आर्थिक नुकसान
मुरूड : प्रतिनिधीपर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुलीच्या निविदेला लॉकडाऊनमुळे ठकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मुरूड नगर परिषदेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.पर्यटनस्थळ असल्यामुळे मुरूडमध्ये पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. या पर्यटकांकडून नगर परिषद पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फीच्या नावाने कर वसुल करते. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यात या कामाचा ठेका …
Read More »पेणमधील पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत
समाजकल्याण विभागातर्फे चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द पेण : प्रतिनिधीशहरातील मळेघर आदिवासीवाडीतील तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. तिच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे तातडीची मदत म्हणून चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा सुधारित …
Read More »राम मंदिराच्या माध्यमातून हिंदूराष्ट्राचा महामार्ग प्रस्थापित होणार -सुरेश गोखले
खोपोली : प्रतिनिधीहिंदुराष्ट्राचा महामार्ग हा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे. पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्रीराम मंदिराच्या माध्यमातून आदर्शांची पुनर्स्थापना होणार आहे, त्यामुळे या कार्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले यांनी मंगळवारी (दि. …
Read More »दिशा महिला मंचकडून पत्रकारांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधीसमाजात घडणार्या सकारात्मक आणि आदर्शवत गोष्टींना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार्या आणि त्याचबरोबर कोरोना संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून सलग वृत्तसंकलन व छायाचित्रण करणार्या पत्रकार व छायाचित्रकारांचा कामोठे येथील दिशा महिला मंचने मंगळवारी (दि. 5) पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. यामध्ये ‘राम प्रहर’चे पत्रकार …
Read More »रायगडात ग्रामपंचायतींसाठी 205 केंद्रांवर होणार मतदान
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असताना जिल्हा प्रशासनानेही या निवडणुकीच्या मतदानाची तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील 88 पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी एकूण 205 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य …
Read More »वार्षिक आराखड्याचा निधी रायगड जिल्हा प्रशासनाकडे वर्ग
निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील निधीला कात्री लावण्यात आली होती. शासनाने रायगड जिल्हा वार्षिक आराखड्याचा 234 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. हा निधी मार्च 2021पर्यंत खर्च होऊ शकला नाही तर विकासकामांसाठी आलेला निधी समर्पित करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper