मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहे. नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बुधवारी (दि. 6) मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून चाचपणी करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत प्रभारी एच. के. पाटील यांनी …
Read More »Monthly Archives: January 2021
आगामी निवडणुकांसाठी भाजप सज्ज
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : प्रतिनिधीराज्यात होऊ घातलेल्या 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसह मार्च किंवा एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता असलेल्या पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) पत्रकार …
Read More »‘त्या’ बलात्कार्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; बौद्धजन पंचायत समितीचे उरण पोलिसांना निवेदन
उरण : वार्ताहर पेण हद्दीतील आदिवासी समाजाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली. अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 यांनी बुधवारी (दि.6) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना दिले. निवेदनात असे नमूद केले आहे की, पेण हददीतील आदिवासी समाजाच्या …
Read More »शिक्षकांचा सत्कार; क्रांतिज्योती महिला विकास फाऊंडेशनचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाची फाऊंडेशनच्या सदस्यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी …
Read More »पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम; आदिवासींना अन्नधान्य वाटप
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि. 6) पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणार्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश …
Read More »नामांतराचे नाटक
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988मध्ये केली. तेव्हापासून हा वाद चालू आहे. गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेना दोन वेळेला सत्तेवर होती. आजही औरंगाबाद महापालिकेत हा पक्ष सत्तेवर आहेच. तरीही सरकार दफ्तरी औरंगाबादचे संभाजीनगर काही होऊ शकलेले नाही. यंदा तेथील महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आलेली असताना हा मुद्दा पुन्हा …
Read More »‘सीकेटी’चे प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना राष्ट्रीय पुरस्कार
पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम कला संस्कृती व साहित्य अकादमीतर्फे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पदक-2020’ हा …
Read More »सिडको मेट्रो प्रकल्प मार्ग क्र. 1च्या अंमलबजावणीचे काम महामेट्रोला
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील 11.1 किमीच्या मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे …
Read More »शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला तातडीने द्या!
एकनाथ देशेकर यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी तालुक्यातील चिंध्रण, कानपोली, महाळुंगे गावांतील शेतकर्यांच्या जमिनी प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्राकरिता संपादित करण्यात आल्या आहेत. त्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी साडेचार कोटींचा मोबदला उच्चाधिकार समितीने ठरवून दिला आहे. तो मोबदला त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन एकनाथ देशेकर यांच्या शिष्टमंडळाने पनवेल प्रांत कार्यालयात निवासी नायब …
Read More »बोरघाटात अपघात; तिघे जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासच्या काही अंतरावर असलेल्या रस्ते विकास करणार्या आफ्कॉन कंपनीच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी 5च्या सुमारास एक टेम्पो (एमएच 46 ई-3136) मुंबईच्या दिशेने जाणार्या पुढील वाहनाला धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper