Breaking News

Monthly Archives: February 2021

रोह्यातील अनंत मगर यांचा कलिंगड शेतीच्या उत्पादनातून शेतकर्‍यांपुढे आदर्श

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी येथील अनंत मगर यांनी कलिंगड  पिकातून लाखोंचे उत्पादन काढुन तरुण शेतकर्‍यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अनंत मगर कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. त्यांची स्वत:ची फार थोडी शेती आहे. त्यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्राच्या बाजूच्या महादेववाडी येथील चाळीस एकर जमीन भाडेतत्त्वावर घेवून, तिथे   विग्रो गोल्डन जातीच्या …

Read More »

नेरळ-कळंब राज्यमार्गावर विनापरवाना बीएसएनएल केबल टाकण्याचे काम

कर्जत : बातमीदार तालुक्यातील रस्त्याच्या बाजूने भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून केबल टाकली जात आहे. सध्या माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाच्या बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत हे काम बंद पाडण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील कोणत्याही रस्त्याच्या बाजूला केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली नाही आणि खोदकाम बंद करावे, …

Read More »

समाधान सामाजिक संस्थेकडून किल्ले रायगड स्वच्छता मोहीम

महाड : प्रतिनिधी शहरातल्या समाधान सामाजिक संस्थेने नुकतीच रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गडावरील होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदिश्वर मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्या पद्दतीने विल्हेवाट लावली. या मोहिमेत संस्थेचे सुयोग निकम, जयंत कदम, भारत वडके, मंगेश सुकूम, गणेश महांगरे, संजय राहिलकर, सचिन सुतार, राजेंद्र पांचाळ, …

Read More »

पोलादपूरमध्ये आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण; कोरोना योद्धा डॉ. राजेश शिंदे पहिले मानकरी

पोलादपूर : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात केलेल्या सेवेनंतर आता पोलादपूर तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असून, येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये मंगळवारी (दि. 9) सकाळी आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांना पहिली लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203 जणांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, त्यात   डॉक्टर, आरोग्य कर्मचारी …

Read More »

पेणमध्ये सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आज निवडणूक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बुधवारी (दि. 10) संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात नेमणूक केलेल्या पीठासन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली  निवडणूक घेण्यात येणार आहे.  पेण तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी महेंद्र पाटील (आंबेघर), प्रकाश मोकल (कामार्ली), राकेश कलमकर (वाक्रुळ), निनाद पाध्ये (काळेश्री), दत्तात्रेय साळुंखे (बोर्झे), रत्नाकर सूर्यवंशी (जोहे) आणि दादासाहेब सोनावणे …

Read More »

कर्नाटक वितरण व्यवस्थेतील गहू-तांदूळ सुधागडमध्ये जप्त

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील बलाप येथील न्यू. डी. जी. फूड ऍग्रो कंपनी या राईसमिलमध्ये कर्नाटक राज्याच्या वितरण व्यवस्थेतील गहू व तांदूळ सापडले आहेत. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 43लाख 97हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

माणगावात गावठी शेंगा वधारल्या; वाल 100 ते 120 रु., मूग 80 रु., चवळी 80 रु. किलो

माणगाव : प्रतिनिधी लांबलेला व अवकाळी पाऊस यामुळे माणगाव तालुक्यात रब्बी हंगामातील विविध कडधान्ये तयार होण्यास उशीर झाला आहे.  पंधरा ते वीस दिवस उशिराने बाजारात दाखल झालेल्या वाल, मूग, चवळी इत्यादी शेंगाची विक्री सध्या माणगावच्या बाजारात जोरदारपणे होत आहे. माणगाव तालुक्यात रब्बी हंगामात वाल, मूग, चवळी इत्यादी कडधान्यांची मोठ्या प्रमाणात …

Read More »

माणगावात मच्छी मार्केटचा प्रश्न गंभीर; अतिक्रमण हटवल्याने विक्रेते उघड्यावर

माणगाव : प्रतिनिधी  नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे लोटली, तरीही नगरपंचायतीने मच्छी मार्केट उभारले नाही. वास्तविक नगर पंचायतीच्या जागेत स्वतंत्र मच्छी मार्केट उभारण्याची गरज होती. माणगावात यापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता उभारलेली त्यांची अतिक्रमणे महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 6) …

Read More »

रोजगाराच्या आमिषाने गरजूंची लूट

कोरोनाच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे आता रोजगाराच्या शोधात असलेल्यांना लुटण्याचा धंदा शहरात आणि ग्रामीण भागात आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.  घर बसल्या पार्टटाइम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एण्ट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा आणि मोबाईल टॉवरचे दरमहा हजारो रुपये भाडे …

Read More »

पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

पनवेल ः वार्ताहर पंचशीलनगर सामाजिक संस्था नवीन पनवेल यांच्याकडून माता रमाई जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. पंचशीलनगर बुद्ध विहारात पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे व खजिनदार भानुदास वाघमारे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. …

Read More »