Breaking News

Monthly Archives: March 2021

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतली कोरोना लस

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 5) खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणार्‍या ज्येष्ठ …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा : चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीतामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, …

Read More »

मालमत्ता कर कमी करा

नवीन पनवेल भाजपची मागणी पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी नवीन पनवेलमधील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची शुक्रवारी (दि. 5) भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी मालमत्त कर कमी करण्याची विनंती करण्यात आली.  कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी …

Read More »

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

धनगर महासंघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑल इंडिया धनगर महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आली.कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शैक्षणिक कला, …

Read More »

नियमांच्या उल्लंघनामुळे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. कोरोना आता गेला अशा संभ्रमात काही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. परिणामी कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. काही …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर टँकरला आग

खोपोली : प्रतिनिधी द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ मुंबईहून पुण्याकडे केमिकल वाहून नेणार्‍या टँकरला शुक्रवारी (दि. 5) आग लागली. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे धावत्या टँकरला अचानक आग लागल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर महामार्गाच्या बाजूस थांबवला. डेल्टा फोर्स कर्मचारी राऊंडला जात असताना टँकरला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्याकडे …

Read More »

खोपोली सायमाळ गावाजवळ अपघात

एक गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील सायमाळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 5) दुपारी दूधाच्या टँकरने क्रेटा कार आणि दुचाकीस्वारला धडक दिली. या अपघातात एक प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. दुधाचा टँकर मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या …

Read More »

माणगावात एकाच रात्रीत सहा घरे फोडली

सहा लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार माणगाव : प्रतिनिधी शहरातील बामणोली मार्गावर एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे पाच लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. माणगावमधील बामणोली मार्गावरील सहा बंद घरे अज्ञात चोरट्यांनी 3 मार्च 2021 रोजी रात्री 11 ते 4 …

Read More »

विदारक चित्र

संकटाचे रूपांतर संधीमध्ये करण्याची कल्पकता आणि सामर्थ्य पंतप्रधान मोदी यांच्या ठायी आहे. अशाच प्रकारची कल्पकता राज्य सरकारांनी देखील दाखवणे अपेक्षित होते. गुजरातसारख्या काही राज्यांनी तसा आत्मविश्वास दाखवला. पण याबाबतीत महाराष्ट्र मात्र फारसे यश गाठीला बांधू शकला नाही. राज्याचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी …

Read More »