Breaking News

Monthly Archives: March 2021

रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची तंतरली : भातखळकर

मुंबई ः प्रतिनिधीआयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगसंदर्भातील अहवालावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे …

Read More »

पंतप्रधान मोदींची जशोरेश्वरी मंदिरास भेट

इश्वरीपूर ः वृत्तसंस्था बांगलादेश दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 27) 51 शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौर्‍यानुसार मोदी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिरात पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, …

Read More »

पनवेलमधील रेस्टॉरंट्स, बारसाठी नवे निर्बंध

पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.महापालिका हद्दीत …

Read More »

रासायनिक कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ ः प्रतिनिधीरासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सकाळी अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल कंपनीमध्ये घडली. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ परिसर पुरता हादरून गेला होता. टाकीत असणार्‍या गॅसमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआयजवळील कंपनीत ही भीषण घटना …

Read More »

भाजप खारघर मंडल शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक शुक्रवारी (दि. 26) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्ट कारभारावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शनही केले.भारतीय जनता …

Read More »

अखेर ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचली

देवेंद्र फडणवीसांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांच्या संख्येवर भर देण्यावर आधीपासूनच आग्रही होता, मात्र वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडी …

Read More »

गुड न्यूज! सप्टेंबरपर्यंत कोवोवॅक्स होणार भारतात दाखल

पुणे : एकीकडे संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतीयांना आनंदाची बातमी दिली. देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी दिल्या जात आहेत. त्यात आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. भारतात या तिसर्‍या कोरोना लशीचे ट्रायल सुरू झाले असून काही महिन्यांतच ही लसही …

Read More »

सुधागडातील हातोंड पंचक्रोषीत भीषण वणवा; लाखोंचे नुकसान, वृक्षसंपदा जळून भस्मसात

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात हातोंड पंचक्रोशीत अग्नीप्रलय झाला असून 48 तासांहूनही अधिक काळ अग्नी तांडव सुरूच होता. दोन दिवस सुरू असलेला हा अग्नी तांडव शनिवार (दि. 27) पर्यंत सुरूच होता. या अग्नी प्रलयात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. नलावडे फार्ममधील 20 …

Read More »

शतकवीर जॉनी बेयरस्टोचा गावसकरांवर निशाणा

पुणे ः प्रतिनिधीइंग्लंडचा ओपनर जॉनी बेयरस्टोने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गावसकरांनी टेस्ट सीरिजदरम्यान बेयरस्टोच्या इच्छाशक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर बेयरस्टोने प्रतिक्रिया दिली. गावसकर मला फोन करून टेस्ट क्रिकेट खेळण्याबाबतच्या माझ्या इच्छाशक्तीबाबत चर्चा करू शकतात, असे बेयरस्टो म्हणाला.भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या चार इनिंगमध्ये बेयरस्टो तीन वेळा …

Read More »

हार्दिक पांड्याला गोलंदाजी न दिल्याने सेहवाग संतप्त

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरोधातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देण्याचे कर्णधार विराट कोहलीने दिलेले कारण ऐकून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला. 337 इतकी आव्हानात्मक धावसंख्या असतानाही इंग्लंडने भारतीय संघाचा सहज पराभव केला. सहा गडी व 39 चेंडू राखत इंग्लंडने भारताचा पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. …

Read More »