प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… प्रकल्पग्रस्त नेते आणि राज्य सरकार यांच्यात 10 मार्च 1984 रोजी झालेल्या बैठकीत …
Read More »Monthly Archives: June 2021
सरकारच्या निर्णयाला वारकरी संघटनांचा विरोध
अकोला ः प्रतिनिधी कोरोनामुळे यंदाही पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. वाखरीवरून प्रतीकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत, मात्र सरकारच्या या निर्णयाला राज्यातील वारकर्यांच्या नऊ संघटनांनी विरोध केला आहे. या संघटनांनी सरकारला या निर्णयावर …
Read More »कोर्लईनजीक समुद्रात बार्ज कलंडले; सर्व 16 जणांना वाचविण्यात यश
रेवदंडा ः प्रतिनिधी मुंबईहून साळाव जेएसडब्ल्यू कंपनीकडे येणारे एम. व्ही. मंगलम नावाचे बार्ज गुरुवारी (दि. 17) सकाळी 7.30च्या सुमारास कोर्लईनजीक समुद्रात कलंडले. सुदैवाने या बार्जमध्ये असलेल्या सर्व 16 कामगारांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साळाव जेएसडब्लू कंपनीच्या अधिकारीवर्गाने बंदर प्रादेशिक विभाग, रेवदंडा पोलीस ठाणे यांना …
Read More »एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक; एनआयएची मोठी कारवाई
मुंबई ः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना गुरुवारी (दि. 17) अटक केली. या प्रकरणात सचिन वाझेंनंतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील दुसरे मोठे अधिकारी आहेत. …
Read More »सिडकोने घेतलेले सेवा शुल्क पनवेल महापालिका करणार परत; आयुक्तांच्या ग्वाहीमुळे नागरिकांना मिळणार दिलासा
पनवेल ः प्रतिनिधी सिडको हद्दीतील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 17) महापालिका आयुक्तांकडे केली. या वेळी सिडको वसाहतींतील नागरिकांच्या मालमत्ता करातून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क …
Read More »आजपासून रंगणार प्रतिष्ठेची डब्ल्यूटीसी फायनल
साउथँप्टन ः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना शुक्रवार (दि. 18)पासून सुरू होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाऊल मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय संघात रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्याकडे सलामीची जबाबदारी असेल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे व …
Read More »वाढीव मालमत्ता करात भूमिपुत्रांना दिलासा द्यावा -निशांत भगत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वाढीव मालमत्ता कर, तीन पट दंड, मागील थकबाकी व अंदाजित क्षेत्रफळ जोडून वितरीत केलेल्या देयकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा नेता निशांत करसन भगत यांनी नवी मुंबई आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई शहरातील …
Read More »पनवेलमध्ये रस्त्यांची डागडुजी; नगरसेवक राजू सोनी यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारांच्या झाकणांची दुरूस्ती तसेच महानगरपालिकेसमोरील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे भरून घेतले आहेत. पनवेल शहरातील लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारावरील झाकण गटाराच्या आत गेले होते. त्यामुळे येथून ये जा करणार्या लोकांना याचा त्रास होत …
Read More »तळोजातील दफनविधी त्वरित सुरू करा; नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी
पनवेल : वार्ताहर तळोजा फेज-1 येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडावर दफनविधी त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बहुजन वंचित विकास संस्थेच्या पदाधिकार्यांसह भेट घेतली. या वेळी दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाविषयी विस्तृत चर्चा झाली …
Read More »द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत ढासळली
उरण : वार्ताहर रायगड जिह्यातील उरण येथील ऐतिहासिक किल्ले द्रोणागिरीचे प्रवेशद्वाराची भिंत आणि चर्चवरील भाग 13 जून रोजी ढासळला. ही घटना अत्यंत गंभीर असून असे होत राहिले तर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होण्याची भीती आहे. द्रोणागिरी किल्ला हा असंरक्षित स्मारक आहे. किल्ल्यावर जाणार्या वाटा पावसाळ्यात बिकट होत आहेत. …
Read More »