Breaking News

Monthly Archives: June 2021

सुधागडातील आदिवासींच्या जमिनी धनदांडग्यांनी लाटल्या; पाच वर्षांतील व्यवहारांची होणार चौकशी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय यादव यांच्या पाठपुराव्याला यश

पाली : प्रतिनिधी आदिवासींच्या जमिनी खरेदी व विक्री व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार  सुधागड तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या आदिवासींच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र या जमिनी बिगर आदिवासींना कवडीमोल किंमतीला विकल्या जात …

Read More »

कामोठेवासीयांच्या मूलभूत समस्यांबाबत सिडको अधिकार्यांना घेतले फैलावर

नगरसेवक विकास घरत यांचा रुद्रावतार पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे वसाहतीतील सेक्टर 34मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमूत्राने ओसंडून वाहत आहेत. त्याची तक्रार करूनसुद्धा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले. त्यांनी रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत …

Read More »

अभिनेता मयुरेश कोटकर यांना जामीन

ठाणे ः प्रतिनिधीमराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना जामीन मिळाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कोटकर यांना अटक करण्यात आली होती.शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मयुरेश कोटकर यांच्यावर अटकेची कारवाई झाली …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या नव्या इमारतीला गळती

अलिबाग येथील प्रकार अलिबाग : प्रतिनिधीयेथील जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. या सेंटरमधील अस्वच्छतेबाबतही अनेक तक्रारी आहेत.रायगडात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर …

Read More »

मराठा आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

संभाजीराजे उद्या घेणार भेट मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात बुधवारी (दि. 16) मूक आंदोलन झाले. या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.या आंदोलनात मराठा समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

विवेक पाटील यांना ईडीची कोठडी

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा नवी मुंबई : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी ठोठावण्यात आली आहे. कर्नाळा बँकेत 500हून अधिक कोटींचा घोटाळा झाला असून त्यात विवेक पाटील यांचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी ठेवीदारांच्या …

Read More »

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा; शेकापचे इतर नेतेही भागीदार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोपआमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने काढले पैसेराज्यातील मविआ सरकारचा कारभारही संशयास्पद पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इतर नेतेसुद्धा भागीदार आहेत. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ड्राफद्वारे पैसे …

Read More »

‘शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेने घेतलेल्या जहाल भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून बुधवारी (दि. 16) आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना भवन परिसरात तुफान हाणामारी झाली. यानंतर माहीम पोलीस ठाण्यात पोहचल्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार …

Read More »

फ्रान्सची जर्मनीवर 1-0ने मात

म्युनिक ः वृत्तसंस्थाअत्यंत भरात असलेल्या विश्वकप विजेत्या फ्रान्सच्या संघाने कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीचा युरो कप 2020मध्ये 1-0 असा पराभव केला आहे. याआधी 2016मध्ये फ्रान्सने युरो कपमध्ये जर्मनीला धूळ चारली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी जर्मनीने गमावली असून फ्रान्सनेच जर्मनीला 1-0 असे पराभूत केले. जर्मनीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु फ्रान्सचा …

Read More »

पाँटिंगचा विश्वविक्रम मोडण्याची ‘विराट’ संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बायो बबलमध्ये भारतीय खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीच्या शतकाकडेही क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. अंतिम सामन्यात विजयासह कर्णधार विराटकडे विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम …

Read More »