Breaking News

Monthly Archives: June 2021

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे सावट

10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी पुणे : प्रतिनिधीमहाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या संकटात असणार आहे. यंदा फक्त 10 मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात वारीसंदर्भात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा …

Read More »

बुद्धिबळ परिचय उपक्रमास प्रतिसाद

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तक्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाराधना या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला.गुगल मीट आणि फेसबुक लाइव्हवरून झालेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या चॅलेंजर चेस अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष शरद वझे यांनी मार्गदर्शन केले. वझे हे पहिल्या जागतिक ग्रँडमास्टर बुद्धिबळ …

Read More »

जुन्या ट्विटचा हास्यास्पद खेळ बंद करा : वॉन

लंडन ः वृत्तसंस्थावर्णभेदीच्या टिप्पणीवरून इंग्लंडकडून पदार्पणाच्या सामन्यातच ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वर्णभेदावर टिप्पणीच्या जुन्या प्रकरणात अनेक क्रिकेटर्स अडकण्याची शक्यता आहे, मात्र इंग्लंड आणि वेल्स बोर्डाचा (इसीबी) चौकशीचा खेळ हास्यास्पद आहे, अशी टीका इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याने केली आहे. क्रिकेटर्सच्या जुन्या ट्विटची चौकशी करणे बंद करा, …

Read More »

ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचे कमबॅक

ब्राझीलिया ः वृत्तसंस्थास्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमुळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टिटे यांनी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार …

Read More »

श्रीलंका दौर्‍यासाठी धवनकडे नेतृत्व

पृथ्वी शॉचे पुनरागमन, ऋतुराजलाही संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावाला आगरी सेनेचा जाहीर पाठिंबा

खोपोली : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्हा आगरी सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मानवी साखळी तयार करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे रायगड जिल्हा आगरी सेनेने ठरविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने फक्त पाच जणांना परवानगी दिल्याने …

Read More »

अलिबागमध्येही ‘दिबां’च्या नावासाठी जोरदार आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 10) अलिबाग येथे मानवी साखळी करण्यात आली. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी कर्जतमध्ये मानवी साखळी आंदोलनाचा एल्गार

कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी   नेरळ ते मानिवली हुतात्मा स्मारकापर्यंत गुरुवारी (दि. 10) मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन

स्थानिकांकरिता रक्त सांडवणार्‍या लोकनेत्याचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे -आमदार रविशेठ पाटील पेण : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवले, शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला अशा लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 10) पेणमध्ये केले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. …

Read More »

मुंबईत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन …

Read More »