Breaking News

Monthly Archives: July 2021

नवी मुंबईतही लवकरच घरोघरी लसीकरण

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. याआधी पालिकेने अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बसस्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य …

Read More »

धोकादायक पुलांची दुरुस्ती करा

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. या दुर्घटनेमुळे जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानूसार जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादयाक अवस्थेत कायम आहेत. काशीद येथील  दुर्घटनेची दखल घेऊन  रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या …

Read More »

भारत सरकारचे खेळाडूंसाठीचे प्रयत्न प्रशंसनीय : सानिया मिर्झा

टोकियो ः वृत्तसंस्थाभारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम राबविली शिवाय बायो-बबलची व्यवस्था केली. हे पाऊल प्रशंसनीय म्हणावे लागेल. आता आम्ही सर्वोत्तम निकाल देण्यास उत्सुक आहोत, असे भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने म्हटले आहे.सहा वेळेची दुहेरी ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन टेनिसपटू सानिया मिर्झा चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास खूप उत्साही …

Read More »

कोरोनामुक्त पंतचे संघात पुनरागमन

दुसर्‍या सराव सामन्यात घेणार भाग लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने कोरोनावर मात केली असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. आता तो दुसर्‍या सराव सामन्यात भाग घेणार आहे.इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाचे संकट ओढवले होते. स्टार फलंदाज ऋषभ पंत आणि सराव सहाय्यक दयानंद गरानी यांना कोरोनाची …

Read More »

अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्तटिंगटाँग ऑनलाइन 14 वर्षाखालील अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर याने प्रथम क्रमांक पटकाविला. पारसने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक 8.5 गुण घेत निर्विवाद वर्चस्व मिळविले.महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, पंजाबच्या सबज्युनियर खेळाडूंनी उत्तम चाली रचून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आत्माराम …

Read More »

कोकणावर अवकृपा

कोकणापासून मुंबईपर्यंत किनारपट्टीचा मोठा पट्टा अतिवृष्टीचे संकट झेलत असताना राज्य सरकार नेमके काय करत आहे हा एक प्रश्नच आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, या नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड तसेच कोकणवासियांना आजही मदत मिळालेली नाही. महाड, चिपळूण परिसरात गुरूवारी आलेल्या महाप्रलयामध्ये नुकसान झेलणार्‍या नागरिकांनी मग सरकारकडून नेमकी काय …

Read More »

पोलादपुरात सावित्री नदीचे पाणी रस्त्यावर

पोलादपूर ः प्रतिनिधीशहरात बुधवारी (दि. 21) सायंकाळी उत्तरवाहिनी सावित्री नदी यंदा प्रथमच रस्त्यावर आली. याचदरम्यान रानबाजिरे येथील एमआयडीसीचे धरण धोक्याच्या पातळीच्या अगदीच जवळ भरून वाहू लागले असल्याने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.पोलादपूर तालुक्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांतील पावसाची नोंद केवळ 64 मिमी असताना दुपारनंतर पावसाने …

Read More »

मंत्री आव्हाडांकडून नियम मोडून मंदिरात आरती

गुन्हा मात्र फक्त कार्यकर्त्यांवर नाशिक ः प्रतिनिधीराज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौर्‍यानिमित्त नाशिकमध्ये आले होते. या वेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मंत्री आव्हाड यांना वगळून मंदिरात …

Read More »

पाणी शिरून नुकसान झाल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तमुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर …

Read More »

लोकल सेवा सुरू करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणीअन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यांतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे, परंतु कोरोनाचे दोन …

Read More »