Breaking News

Monthly Archives: July 2021

जांभुळपाड्याला दरडींचा धोका

दोन वर्षे उलटूनही उपाययोजना नाही पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावावरही दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, तेथील दोन कुटुंबे दहशतीखाली वावरत आहेत. तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली होती, त्याला दोन वर्षे होऊनही अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. वर्‍हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळपाडा येथे रविंद्र …

Read More »

प्राथमिक शिक्षक समन्वय समिती सुधागड मार्फत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाली : प्रतिनिधी अतिवृष्टीने महाड, पोलादपूरसह विविध भागात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तेथील आपद्ग्रस्तांना प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या सुधागड शाखेतर्फे  जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वापट करण्यात आले. प्राथमिक शिक्षक समन्वय समिती या संघटनेच्या  समन्वय समितीने सर्व शिक्षकांना पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सुधागड तालुक्यातील केंद्रप्रमुख, …

Read More »

महाडच्या पूरग्रस्त भागात मुरूडच्या श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम

मुरूड : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मुरुड तालुक्यातील श्री सदस्यांनी महाड तालुक्यामधील पुरग्रस्त गावांत स्वच्छता मोहीम राबवून तेथील मंदिरे, शाळा, आंगणवाड्या आणि ग्रामपंचायत कार्यालयांची साफसफाई केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी व विश्वस्त सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड तालुक्यातील काशीद, मजगाव, आदाड, राजपुरी, आगरदांडा, टोकेखार येथील सुमारे 383 श्री …

Read More »

कर्जत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महाड, पोलादपूरातील पूरग्रस्तांना मदत

कर्जत : बातमीदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत तालुक्यातील स्वयंसेवकांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील   पुर बाधित गावात जावून विविध प्रकारची मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्जत शाखेचे स्वयंसेवक दोन गटात महाड आणि पोलादपूर तालुक्यात पोहचले आहेत. त्यातील काही कार्यकर्ते पुरग्रस्त गावात जाऊन तेथे कोणत्या वस्तूंची गरज आहे, …

Read More »

लवलिनाचा पदकासाठी विजयी ठोसा

टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोरगोहेनने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले. लवलिना बोरगोहेनने निएन चिन चेनवर 4-1 असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी …

Read More »

वृक्षो रक्षति रक्षित:

पर्यावरणातील सर्वात प्रमुख घटक म्हणजे झाडे. झाडांच्या विपुलतेवर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील सर्व सजीव आपापल्यापरीने सृष्टीला अन्नाच्या बदल्यात काही ना काही परत करत असतात. ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी मदत होते. केवळ माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो निसर्गाकडून सतत खूप काही ओरबाडून घेण्यातच दंग आहे. आणि …

Read More »

जपानच्या खेळाडूला नमवून पीव्ही सिंधूची उपान्त्य फेरीत धडक

टोकियो : वृत्तसंस्था 2018च्या रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सिंधूने यामागुचीवर संपूर्ण दबाव ठेवला. सिंधूच्या आक्रमकतेपुढे ती टिकू शकली नाही. सिंधूने यामागुचीवर 21-13, 22-20 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-7 अशी आघाडी …

Read More »

भारतीय नेमबाजांकडून निराशा; एकही पदक नाही

टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नेमबाजीतून सर्वाधिक पदक मिळण्याची आशा होती तेथे भारताला एकही पदक अद्याप मिळवता आले नाही. ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांना मोठे अपयश आले. आज झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता फेरीत देखील भारताला मोठी निराशा हाती आली. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता …

Read More »

दीपिका कुमारी पराभूत; आव्हान संपुष्टात

टोकियो : वृत्तसंस्था भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा दीपिकाकडून व्यक्त केली जात होती. पण ही अपेक्षा पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली. जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या अ‍ॅन सॅनने सलग 3 सेटमध्ये दीपिकाचा पराभव केला. …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडला नमविले

टोकियो : वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पूल-ए मधील सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदवत बाजी मारली आणि 1-0ने बाजी मारत अंतिम-8 मध्ये स्थान पक्के केले. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध गोल करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत राहिले. …

Read More »