Breaking News

Monthly Archives: July 2021

ठेविले अनंते तैसेचि रहावे

मुसळधार पावसामुळे घरसंसारातील होते नव्हते ते सारे वाहून गेले. कोरोनामुळे अनेकांचे सर्वस्व आधीच पणाला लागलेले होते. इकडे आड आणि तिकडे विहिर अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्राची निम्मी अधिक जनता कसेबसे दिवस कंठत आहे. तरीही निर्बंधांचा काच बराचसा कमी करून नागरिकांना तत्परतेने मोकळीक द्यावी असे महाविकास आघाडी सरकारला वाटत नाही. अद्यापही एक-दोन …

Read More »

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध होणार शिथिल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोना  रुग्णसंख्येचे प्रमाण घटत असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील रुग्णवाढीचा दर कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा …

Read More »

कै. मेघनाथ म्हात्रे यांची रविवारी शोकसभा

उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात येत्या रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कामोठ्यातील गोवारी कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू काल्या गोवारी ऊर्फ विठूशेठ यांचे नुकतेच निधन झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यात जाऊन गोवारी कुटुंबीयांचे सांत्वन केले. विठूशेठ गोवारी यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य राहिले आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू …

Read More »

पनवेल महापालिकेने चुकीच्या प्रॉपर्टी टॅक्स बिलांमध्ये सुधारणा करावी; भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे आयुक्तांना निवेदन, कर भरण्यास मुदतवाढ देण्याचीही मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त महानगरपालिका अंतर्गत पनवेल शहरातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी टॅक्सच्या दिलेल्या चुकीच्या बिलांमध्ये सुधारणा करावी, तसेच नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पगडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेने …

Read More »

निसर्गावर खापर फोडू नका!

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. या दुर्घटनांमध्ये 95 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले. महाड शहरात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळतात, पूर येतात. त्यात जीवित व वित्तहानी होते. त्यानंतर पंचनामे होतात. नुकसानभरपाई दिली जाते. सारा दोष …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आता तळोजा जेलमध्ये

पनवेल ः प्रतिनिधी शेकापचे माजी आमदार व कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बुधवारी (दि. 28) सायंकाळी 7च्या सुमारास तळोजा तुरुंगात आणण्यात आले. येथे त्यांना तुरुंगातील कैद्यांसाठी असलेल्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांचा कर्नाळा बँक घोटाळा आणि भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम …

Read More »

दिदी के हसीन सपनें

ममता बॅनर्जी सध्या पाच दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी निरनिराळ्या विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध भारत अशी असेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इतकेच …

Read More »

पूरग्रस्तांना वाढीव मदत द्या; विरोधी पक्षनेते फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी, दबाव आणून संघर्ष करण्याचाही इशारा

सांगली ः प्रतिनिधी पुरामुळे यंदा राज्यात झालेले नुकसान 2019च्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना वाढीव मिळणे आवश्यक आहे. पुरामुळे बाधीत झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी याकरिता राज्य सरकारवर दबाव आणून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते सांगलीत बोलत होते. विधानसभा विरोधी …

Read More »

ओबीसी, ईडब्ल्यूएस घटकांना मेडिकल प्रवेशासाठी आरक्षण

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक प्रवेशांसाठी देशभरात यंदा इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि …

Read More »