Breaking News

Monthly Archives: July 2021

देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; केंद्र सरकारकडून आढावा व सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मागच्या चार दिवसांत कोरोनावर उपचार घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. 10 राज्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांचा आढावा घेतला आणि कोरोनासंबंधी कडक उपाययोजना …

Read More »

पूरग्रस्त महाडमध्ये साथरोगांचे संकट; लेप्टो, कोरोना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क

अलिबाग ः प्रतिनिधी पूरग्रस्त महाडमध्ये आता नवे संकट उभे ठाकले आहे. पुरानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 19 जणांना लेप्टो स्पायरेसीस, तर तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबराबेर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.  महाड आणि पोलादपूर …

Read More »

सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला 18-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकली नाही. पहिल्या गेममध्ये ती …

Read More »

‘रोटरी‘चा पदग्रहण सोहळा उत्साहात

पनवेल : वार्ताहर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा झाला. मावळते अध्यक्ष संजय झेमसे यांनी मागील वर्षभरात केलेले कार्य सांगून सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष विजय निगडे यांच्या …

Read More »

दीर्घकालीन संपत्ती निर्मिती – मिडकॅप फंड

म्युच्युअलफंडात गुंतवणूक करणार्‍या भारतीय नागरिकांची संख्या वाढत असून त्यांना परतावाही चांगला मिळतो आहे. त्यातही डायरेक्ट मिडकॅप फंड अधिक परतावा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे भविष्यात लार्जकॅप होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांत ही गुंतवणूक केली जाते. शेअर बाजार व म्यच्युअल फंडाचे नियमन करणार्‍या सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्सेंज बोर्डाने (सेबी) म्युच्युअल फंडांना त्यांच्या …

Read More »

महिला व बालकल्याण समितीतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य करावे

सभापती मोनिका महानवर यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे पालिका हद्दीतील विधवा महिलांना अर्थसहाय्य करण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सभापती मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे. महानवर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेतील सन 2020-21 या वर्षी ज्या …

Read More »

संभाव्य तिसर्या लाटेला रोखण्यासाठी पनवेल पालिका सज्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक पनवेल : वार्ताहर कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

झोमॅटोचे बाजारमूल्य ही मोठ्या बदलाची नांदी का आहे?

सातत्याने तोट्यात असलेल्या झोमॅटो कंपनीचे बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? पंजाबमधील 38 वर्षांचा दिपींदर गोयल हा तरुण, सध्या चर्चेत असलेल्या झोमॅटो …

Read More »

भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत अंतिम फेरीत

टोकियो ः वृत्तसंस्था भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरने आपल्या कामगिरीतील सातत्य आणि लौकिकाला साजेसा खेळ करीत झोकात टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे, मात्र भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही. …

Read More »

भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल ; वंदना कटारियाची विक्रमी हॅट्ट्रिक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने पूल ‘ए’च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना ही ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. …

Read More »