Breaking News

Monthly Archives: July 2021

पोलादपूरच्या कुडपणमध्ये पर्यटकांची गर्दी; एसटीअभावी ग्रामस्थ मात्र झालेत स्थानबद्ध

पोलादपूर : प्रतिनिधी अनियमित एसटी बस सेवेमुळे पोलादपूर तालुक्यातील थंड हवेच्या कुडपण खुर्दमधील ग्रामस्थांना गाव सोडणे कठीण झाले असून, पर्यटक मात्र खासगी वाहनांनी ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तातडीने एसटी बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या ब्रिटीशकालीन हिलस्टेशनचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे प्रयत्न …

Read More »

मुरूड समुद्रकिनारी डांबरसदृश ऑइल; मच्छीमार चिंतेत

मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑइल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी मुरूडमधील कोळी बांधव कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्रकिनारी जाळी टाकून (पेर्‍याने) मासेमारी करतात मात्र मुरूड समुद्रकिनार्‍यावर खराब ऑइल वाहून आले आहे. खोल समुद्रात तेल विहिरी आहेत. …

Read More »

कर्जतमध्ये पावसाची दडी; भाताची रोपे सुकू लागली, शेतकरी हवालदिल

कर्जत : बातमीदार तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हिरवीगार झालेली भाताची रोपे पावसाअभावी सुकू लागली आहेत. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास काही शेतकर्‍यांवर दुबार  पेरणी करण्याची वेळ येणार आहे. कर्जत तालुक्यात 10 हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यासाठी बाजारातून भाताचे बियाणे विकत आणून …

Read More »

12 प्रलंबित, 12 निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी जे काही घडले ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा विक्रम महाविकास आघाडी सरकारच्या नावे नोंदवला गेला. सभागृहाबाहेर तुम्हाला पळता भुई थोडी करू अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी दिली, ती …

Read More »

अर्जेंटिना उपांत्य फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसीच्या 76व्या आंतरराष्ट्रीय गोलमुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरवर 3-0 अशी मात करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशस्वी खेळात सातत्य राखत मंगळवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला कोलंबियाचा सामना करायचा आहे. मेसीने या लढतीत तिसर्‍या क्रमांकाचा गोल केला, पण आधीच्या दोन गोलमध्येही …

Read More »

टी-20 क्रिकेटमध्ये सुबोध भाटीचे द्विशतक

17 षटकार, 17 चौकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीटी-20 क्रिकेट ह्या कमी चेंडूंच्या जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हीदेखील दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्याच वेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसर्‍यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधने 79 चेंडूंमध्ये 205 धावा काढल्या. या …

Read More »

आयपीएल 2022साठी ब्लू प्रिंट

बीसीसीआयकडून मेगा ऑक्शनची तयारी; मुंबई इंडियन्समध्येही होणार बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याच वेळी आता बीसीसीआयने आयपीएल 2022साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022ची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : चौकशीत संचालकांचे वेळकाढूपणाचे धोरण, कारवाई लांबवण्यासाठी पुढील तारीख घेण्याचे तंत्र, खातेदार आणि ठेवीदार मात्र आपल्याच पैशांपासून वंचित

पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले संचालक आणि हयात नसलेल्या संचालकांच्या वारसांना सहकार खात्याने नोटीस बजावूनही ते उपस्थित राहत नसून वेळकाढूपणा करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. संचालकांच्या या विलंबामुळे खातेधारक आणि ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळायलाही विलंब होईल. कर्नाळा बँकेतील …

Read More »

आजपासून अधिवेशनाची रणधुमाळी; ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले -फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत सोमवार (दि. 5)पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हे अधिवेशन दोनच दिवसांचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली …

Read More »

कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर पंतप्रधान विचार मांडणार

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 5) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली. जगभरातील देश सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोविन अ‍ॅपसंदर्भात …

Read More »