Breaking News

Monthly Archives: July 2021

मराठा आरक्षण : आधी राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्ण करावी -पाटील

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे असे समजून राज्य सरकारने स्वस्थ बसू नये. केंद्र सरकारकडून ती जबाबदारी पूर्ण होण्यासाठी आधी जे आवश्यक टप्पे राज्य सरकारने पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तातडीने काम करावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.पाटील …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांचे साथीदारही होणार गजाआड

‘ईडी’पाठोपाठ आता राज्य सीआयडीही करणार कारवाई पनवेल ः प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणे आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या जामीन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांना अद्याप जामीन मंजूर केलेला नसल्याने ते जेलमध्येच आहेत. या प्रकरणात सहकार खात्याने केलेल्या …

Read More »

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी कृतीदल कार्यान्वित

अलिबाग : जिमाका कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे. कोरोनामध्ये आई, वडिलांचा मृत्यू होऊन रायगड …

Read More »

भारताने दुय्यम संघ पाठवून श्रीलंकेचा अपमान केला; अर्जुन रणतुंगाची टीका

कोलंबो ः वृत्तसंस्थाश्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने भारताने श्रीलंका दौर्‍यासाठी दुय्यम संघ पाठविल्याने नाराजी व्यक्त केली आहे. हा आमच्या देशाचा अपमान असल्याची टीकाही  रणतुंगा याने केली.एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौर्‍यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी …

Read More »

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्ह, फेडरर, बार्टी तिसर्‍या फेरीत

लंडन ः वृत्तसंस्थाजर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजयमिळवून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. एलिना स्विटोलिनाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनवर 7-5, …

Read More »

टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक

जानेवारी 2022पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने स्पर्धांची एकापाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे.सध्या भारताचा एक …

Read More »

ठरला एकदाचा फॉर्म्युला!

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डांनी आपापल्या परीक्षांचा फॉर्म्युला गेल्याच महिन्यात जाहीर केला होता. त्यांच्या फॉर्म्युल्याला न्यायालयाने मान्यताही दिली होती. राज्य शिक्षण मंडळांनी आपला मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर करावा व केंद्रीय शिक्षण मंडळांप्रमाणेच 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील एचएससी …

Read More »

आर्या वनौषधी संस्थेतर्फे वनौषधी रोपांचे डॉक्टरांना वाटप

पनवेल : वार्ताहर डॉक्टर्स डेचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेतर्फे डॉक्टररुपी देवदूतांना वनौषधी रोपे व सन्मानपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास एकता आवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे, आर्या पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही, …

Read More »

कृषी दिनानिमित्त गुळसुंद्यात विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1) कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम समारोप कार्यक्रम झाला. या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून …

Read More »

नवी मुंबईत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल व श्री साई ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारा येथे रक्तदान शिबिर झाले. संस्थेच्या अध्यक्ष आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी …

Read More »