Breaking News

Monthly Archives: August 2021

पनवेलमध्ये निघाली मशाल रॅली

पनवेल ः प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आल्यानंतर सायंकाळी पनवेल शहर परिसरात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकींवरून मशाल रॅली काढण्यात आली होती. या जनजागृतीपर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पनवेलमधील छत्रपती शिवाजी …

Read More »

खालापुरात आदिवासी दिन उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने श्रमजीवी संघटनेतर्फे सोमवारी (दि. 9) खालापूर शहरात पालखी काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ढोलताशांच्या आवाजावर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी सोमवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती. या वेळी …

Read More »

मानिवलीतील स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त कर्जत तालुका पंचायत समिती आणि ग्रुपग्रामपंचायत मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली येथील हुतात्मा स्मारकात सोमवारी (दि. 9) आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा स्मारकातील स्वातंत्र्यसेनानी गोमाजी पाटील सभागृहात आयोजित केलेल्या …

Read More »

महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा पूरग्रस्तांना एक हात मदतीचा; नगरमधून महाड, पोलादपुरात जीवनावश्यक वस्तू

अलिबाग : प्रतिनिधी महापुरात महाड, पोलादपूर तालुक्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी अनेक हात पुढे आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषददेखील यात मागे राहिली नाही. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केलेल्या आवाहनानुसार संस्थेच्या अहमदनगर जिल्हा शाखेकडून मोठ्या प्रमाणावर मदत आली असून, महाड व पोलादपूर तालुक्यातील …

Read More »

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही !

१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन  पनवेल : रामप्रहर वृत्तजो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य …

Read More »

बोर्ली-मांडल्याचे सागरी पोलीस ठाणे अडीच दशके कागदावरच!

मुरूड : संजय करडे मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर काही ठिकाणी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुरूड तालुक्यातील बोर्ली-मांडल्याचाही समावेश होता, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि योग्य पाठपुराव्याअभावी गेली अडीच दशके बोर्ली-मांडला पोलीस ठाणे कागदावरच असून ते सुरू करणे ही काळाची गरज …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन स्पर्धांचे ‘सीकेटी’त पारितोषिक वितरण

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस झाला. यानिमित्त ऑनलाइन घेतलेल्या स्पर्धांमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 6) …

Read More »

ज्वेलर्समालकाला लुबाडले; भामट्याविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर वाशी सेक्टर 9 मधील डोळ्यांचे डॉक्टर असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्वेलर्स मालकाकडून एक लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडून पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव बसंतीलाल ओस्तवाल (वय 55) असे …

Read More »

सायबर गुन्हेगाराकडून नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला गंडा

पनवेल : वार्ताहर ऑनलाइन आयफोन विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या उरणमधील नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. मोरा सागरी पोलिसांनी या प्रकणातील सायबर गुन्हेगारांवर फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली महिला नेव्हल ऑफीसरची पत्नी …

Read More »

पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो सांगून फसवणूक

पनवेल : वार्ताहर सीपी ऑफिसमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगून 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. सेक्टर 14, कामोठे येथे सुहासिनी घोरपडे या राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणारा व्यक्ती मिलिंद कदम हा त्यांच्याकडे आला व तो सीपी ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे …

Read More »