Breaking News

Monthly Archives: September 2021

‘केएलई’च्या विद्यार्थ्यांनी केली रोडपाली तलाव परिसराची स्वच्छता

पनवेल : वार्ताहर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याचबरोबर विविध उपक्रमांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून श्रमसंस्कार केले जातात. या माध्यमातून श्रमाचे महत्त्व एक प्रकारे पटवून दिले जाते. दरम्यान, याच उद्देशाने कळंबोलीतील केएलई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रोडपाली तलावालगत स्वच्छता अभियान घेतले. महापालिकेच्या सहकार्याने त्यांनी परिसर स्वच्छ केला. आजादी का अमृत महोत्सव या …

Read More »

जाधव कुटुंबीयांना वीज मंडळाकडून मदत

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40) याचा वीज पोलवरून पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वीजमंडळाकडून पाच लाख रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून गुरुवारी (दि. 23) सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली. वीजमंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हे मोहोपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील …

Read More »

तिसर्या लाटेसाठी नवी मुंबईत जोरदार तयारी

आणखी सहा हजार खाटांसाठी निविदा प्रक्रिया नवी मुंबई : प्रतिनिधी अहमदनगरपासून सुरू झालेल्या करोनाच्या तिसर्‍या लाटेचे लोण कोणत्याही क्षणी राज्यात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई पालिकेने ऑक्टोबर महिन्यात ही लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन 11 हजार 542 विविध …

Read More »

वाढता वाढता वाढे-100वरून 60 हजार आणि केवळ 42 वर्षांत!

शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात खरोखरच साठी गाठली. अशा या बाजाराने 1979 पासून आतापर्यंत 60 हजार टक्के (100-60100) म्हणजे गेली 42 वर्षे द.सा.द.शे. 16 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे! या वर्षात जगात सर्वाधिक परतावा देणार्‍या भारतीय शेअर बाजाराच्या ‘बुल-रन’चा हा आढावा. ऑक्टोबर 1998 मध्ये जेव्हा मी शेअर बाजारात प्रवेश केला तेव्हा …

Read More »

बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आज अर्थव्यवस्था कशी दिसते?

कोरोनावर भारताने मात केली आहे की नाही, हे नजीकचा भविष्यकाळच ठरविणार असला तरी भारतीयांनी त्याला स्वीकारून आपले व्यवहार सुरू केले आहेत, याची प्रचीती बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आली. हजारो नागरिक आणि श्रमिक भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आपला वाटा उचलताना दिसत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, हे भारतीय शेअर बाजार ज्या …

Read More »

चिरनेेर जंगल सत्याग्रहाचा आज 91वा स्मृतिदिन

चिरनेर : प्रतिनिधीउरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात येते. चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलीस यांच्या …

Read More »

दाखले वाटप शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 24) कळंबोली येथील …

Read More »

पनवेल मनपातर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेतर्फे महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण आणि मुलींसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणांतर्गत महिलांना व मुलींना शिवणकाम, ब्युटिशन, फॅन्सी बॅग, पेपरच्या पिशव्या तयार करणे, बेकिंग प्रॉडक्ट, केक तयार करणे असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणार्‍या मुलींना …

Read More »

अनंत गीते भंगारात काढलेले नेते; राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांची खरमरीत टीका

कळंबोली : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर ते पक्ष कदापि सहन करणार नाही. अनंत गीते हे शिवसेनेने भंगारात काढलेले नेते असून ते दोन वर्ष  विजनवासात होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी कळंबोली येथे गुरुवारी (दि. …

Read More »

रायगड जिल्ह्यात गौरा गणपतींचे आगमन

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 24)   साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले.   दीड दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. 25) या गणपतीना निरोप दिला जाईल. गौरा गणपातीची प्रथा फक्त रायगड जिल्ह्यातच आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ   गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा …

Read More »