रोहे : प्रतिनिधी 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटनस्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी अॅग्रो …
Read More »Monthly Archives: September 2021
फिनो बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा
पेण : प्रतिनिधी फिनो बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना डिजिटल सेवा देण्याचा बँकेचा हेतू असून आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पेणमध्ये फिनो बँकेच्या आउटलेटची सुरुवात विभुते इन्टरप्रायजेसच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे कोकण मुख्य प्रबंधक गौतम जाधव यांनी दिली. पेणमधील फिनो बँकेच्या डिजिटल सेवा देणार्या शाखेची सुरुवात चिंचपाडा येथे करण्यात आली असून या …
Read More »नियोजित नानानानी पार्कवरील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथे पाताळगंगा नदीकाठी नानानानी पार्कचा प्रस्ताव वाढत्या अतिक्रमणामुळे रखडणार असून, नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी अतिक्रमण विषय किती गांभीर्याने घेणार याकडे खोपोली नागरिकांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षापूर्वी खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौक रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले …
Read More »लसीकरण महोत्सव
कर्जत शहरात कोरोनाचे रुग्ण यांची संख्या गेल्या 15 महिन्यात शून्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे आता पालिका आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक प्रभागात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यावर भर दिला आहे.कर्जत शहर लसीकरण संघर्ष समिती यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात यावर्षीचा गणेशोत्सव लसीकरण उत्सव झाला आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहर लसीकरण …
Read More »महिलांची सुरक्षा ऐरणीवर
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एका महिलेवरील अमानूष अत्याचार आणि वेदनादायी मृत्यूने अवघा देश सुन्न झाला आहे. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारमधील मंत्री ‘वसुली’ करण्यात गुंतले असल्याने नराधम सोकावले असून ते बिनधास्तपणे दुष्कृत्ये करीत असल्याचे संतापजनक चित्र पहावयास मिळत आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मच्छीमारांनी मानले आभार!
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या बहुचर्चित असलेला न्हावा शिवडी प्रकल्प जो भविष्यात मुंबई अणि नवी मुंबई यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. ज्यामुळे दळणवळण अधिक सुखकर होणार आहे. या प्रकल्पातील ब्रिजच्या कामामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एमएमआरडीएसोबत बैठक घेऊन मार्गी लावली. त्यानुसार …
Read More »दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
रायगडात गणेशोत्सवाला साधेपणात सुरूवात अलिबाग : प्रतिनिधीअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे शुक्रवारी घरोघरी आगमन झाले. आपल्या लाडक्या बाप्पांची भक्तांनी मनोभावे सेवा केली. दरम्यान, दीड दिवसांच्या गणपतींचे शनिवारी (दि. 11) अत्यंत साध्या परंतु भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या उद्देशाने कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन …
Read More »महाआघाडीत जुंपली
छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये खडाजंगी नाशिक : प्रतिनिधीअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मोठी शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळेझालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या …
Read More »मुंबईतील निर्भयाचा अखेर मृत्यू
देशभरातून संतप्त प्रतिक्रिया; आरोपीला फाशी देण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत …
Read More »विवेक पाटील 28 सप्टेंबरपर्यंत कोठडीतच
पनवेल : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सत्र न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 जून रोजी पनवेल येथील घरातून अटक केली होती. विवेक पाटील यांना तळोजा जेलमधून रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये …
Read More »