Breaking News

Monthly Archives: October 2021

पनवेल तालुक्यातील शाळाही सोमवारपासून होणार सुरू

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याची महत्त्वाची अट शासनाने घातली आहे. ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीच्या सर्व शाळा …

Read More »

स्वच्छता दूतांचा सत्कार

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम पनवेल : वार्ताहर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल महापालिका स्वच्छता दूत असे प्रशस्तीपत्र देऊन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या कर्मचार्‍यांचा सन्मान महात्मा गांधी उद्यानात केला. या वेळी महात्मा …

Read More »

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य …

Read More »

राज्य शासनाची ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी

उरणमधील 80 टक्के शेतकरी अँड्रॉइड मोबाइलअभावी सुविधेपासून वंचित उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न उरणच्या शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनिवार्य करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करून ती महसूल विभागाच्या …

Read More »

पालक गमावलेल्या बालकांना आणि एकल महिलांना मिळणार अर्थसहाय्य; कोविडच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाचा निर्णय

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे घेण्यात आला आहे, तसेच कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा एकल महिलांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या शुक्रवारी (दि. 1) झालेल्या ऑनलाइन बैठकीत याला …

Read More »

आमदार महेश बालदींनी घेतली एमआयडीसी प्रशासनासोबत बैठक; मतदारसंघातील विषयांसंदर्भात चर्चा

मुंबई : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी अंधेरी येथे एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आमदार महेश बालदींनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले. बालदी यांनी निवेदनात म्हटले की, माझ्या उरण विधानसभा मतदारसंघातील आपल्या विभागाशी संबंधित अनेक विषय …

Read More »

शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल पंचायत समितीत परीक्षांमध्ये गुणगौरव प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी (दि. 1) करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत उपस्थित होत्या. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी …

Read More »

वाहतूक कोंडी उपाययोजनांचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरात भेडसवणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांंत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानुसार वाहतूक कोंडीला आळा घालण्यासंदर्भात पोलिसांमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह …

Read More »

पाली एसटी बसस्थानकाला सांडपाण्याचा विळखा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे  स्थान असलेल्या पाली येथील बसस्थानक परिसर गटारातील सांडपाणी व घाणीचे आगार झाले आहे. येथील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. …

Read More »

आजिवली येथे शासकीय दाखले वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार आजिवली येथे जनता विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला.या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुका …

Read More »