खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन येथे आयटीआय समोरील इमारतीतील चार ते पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. दुकानदारांनी याबाबत तक्रारच दिली नसल्याने, किती माल चोरीस गेला हे समजू शकले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याबाबत दुजोरा दिला, मात्र काहीच …
Read More »Monthly Archives: November 2021
असंख्य भाविकांनी घेतले बाप्पाचे दर्शन; अंगारक संकष्ट चतुर्थीचा साधला योग; मंदिरांत गर्दी
उरण : वार्ताहर,प्रतिनिधी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेरच्या महागणपतीचरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी मंगळवारी (दि. 23) गर्दी केली होती. निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे. या गावात असणारे महागणपती …
Read More »भरकटलेल्या कासवाला पालीत तरुणांनी दिले जीवदान
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर रात्री काही तरुणांना एक भरकटलेले कासव दिसले. या तरुणांनी ताबडतोब शिवऋण प्रतिष्ठान या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती कळवली व कासवाला वाचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर पालीतील शंतनु लिमये या प्राणीमित्र युवकाने तेथे जाऊन कासवाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कासवाला सुरक्षितपणे विहिरीमध्ये सोडले, …
Read More »स्थलांतरीत पक्ष्यांनी उरणचे खाडी-किनारे गजबजले
उरण : वार्ताहर थंडीची चाहूल लागताच उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशये, समुद्री खाड्या तसेच समुद्र खाडी किनार्यावर विविध स्थलांतरीत जलचर पक्षांची गर्दी वाढली आहे. या विविध प्रकारच्या आकर्षक पक्षांमध्ये अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्षांबरोबरच काही दुर्मीळ पक्षांचाही समावेश आहे. उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बोकडवीरा-बीपीसीएल, …
Read More »चारफाटा ते डिकसळ मार्गावर पोलीस बीट उभारण्याची मागणी
कर्जत : बातमीदार कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ ते चारफाटा या दरम्यान पोलीस बीट सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांनी ही मागणी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे. माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाणार्या आणि कर्जत तालुक्यातून ठाणे-मुंबई कडे जाणार्या कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर …
Read More »नवी मुंबई भाजपतर्फे सफाई कामगारांचा सत्कार
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये मिळालेल्या यशासाठी तुर्भे परिसरातील सफाई कामगारांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. रामचंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक तसेच सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज …
Read More »मुरूड नगर परिषदेकडून मोकाट गुरांवर कारवाई
मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेने भटक्या मोकाट गुरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून दस्तुरी नाका येथे एक मोठा कोंडवाडा तयार केला आहे. त्यामध्ये किमान आठ गुरे राहू शकतात अशी क्षमता आहे. दिवसाला तीनशे रुपये दंड आकारण्याची प्रक्रिया मुरूड नगर परिषदेने सुरू केली आहे. पकडलेली बैल अथवा गाय सात दिवसाच्या आत …
Read More »ओएनजीसीकडून देशाचा अमृत महोत्सव साजरा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील ओएनजीसी सीआयएसएफ उरण-मुंबईकडून देशाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आरटीसी बँड पथकानी देश भक्तिपर गीत सादर केली. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ओएनजीसी मुंबई येथील कमांडर ललित शेखर झा व जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णु स्वरूप यांनी …
Read More »उरण कुंभारवाडा येथे गटाराच्या कामाचे भूमिपूजन
उरण : नगर परिषद हद्दीतील कुंभारवाडा वॉर्ड न. 4 मधील गटाराच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. 22) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने व नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहरध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये विकास कामे होत आहेत. कुंभारवाडा येथे …
Read More »पनवेल मनपातर्फेही चाचण्यांवर अधिक भर; महिनाभरात फक्त 658 कोरोनाबाधित
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्याभरात पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 77,623 संशयितांची कोरोना चाचणी केल्यानंतर 658 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर उपचारांदरम्यान महिन्याभरात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्यांची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीमुळे पालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1363 वर पोहचली आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण …
Read More »