Breaking News

Monthly Archives: November 2021

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास

उरण : प्रतिनिधी प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरण्यात बंदी करावी या मुख्य विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा असा 650 किलोमीटरचा सायकल प्रवास उरण येथील विवेक घरत आणि रोहा येथील सूरज खांडेकर या दोन तरुणांनी केला आहे. प्रदूषण ही समस्या मोठी गंभीर बनली आहे. …

Read More »

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ऑनलाइन विज्ञान परीक्षा

पनवेल : प्रतिनिधी मराठी विज्ञान परिषदेने ‘वेध 2035’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी लिखित मजकूर, व्हिडीओ व्याख्याने, प्रयोगांचे व्हिडीओ, विज्ञान-कोडी, कूट-प्रश्न, विज्ञान-खेळ अशी भरपूर अभ्यास-सामग्री पुरवली जाईल. यासाठीची प्रवेश प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे हे …

Read More »

राजपत्रित अधिकारी महासंघाची कोकण भवन समन्वय समिती जाहीर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांची निवड झाली आहे. ही घोषणा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली. महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »

अपघातग्रस्त दीपक पाटील यांना आर्थिक मदत; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते धनादेश

उरण : वार्ताहर नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेअर हाऊसमध्ये अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या दीपक महादेव पाटील यांना भाजपच्या पदाधिकार्‍यांनी उपचारासाठी संबंधित कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून दिली आहे. या मदतीचा धनादेश आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आला. काही दिवसापूर्वी नवघर येथील मल्टीमोड …

Read More »

लघुपट स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीवर आधारित ‘कर्मयोगी नमो’या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. …

Read More »

नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यातील 105 ठिकाणी 21 डिसेंबरला मतदान मुंबई ः प्रतिनिधीराज्यात विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली.मदान यांनी …

Read More »

नवी मुंबईत लवकरच सुसज्ज लायब्ररी; आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती

नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा येथील लायब्ररी करिता देण्यात येणारा भूखंड हस्तांतरण करार लवकरच होणार आहे. या लायब्ररीसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबई शहरात सुसज्ज लायब्ररी होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रोळी-बेलापूर येथे बुधवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुकापूर परिसरात पथदिव्यांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील भगतवाडी ते मालेवाडी स्टॉप या माथेरान रोडवर पथदिवे उभारून हा परिसर प्रकाशमय करण्यात आला. या पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी …

Read More »

‘रवि डायवेअर’च्या कामगारांना वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करार पनवेल ः रामप्रहर वृत्तजय भारतीय जनरल कामगार संघटनेने रवि डायवेअर कंपनीतील कामगारांना 10 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. या संदर्भातील करार बुधवारी (दि. 24) भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सल्लागार तथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत …

Read More »

महिला सुरक्षेबाबत आघाडी सरकार बेफिकीर; भाजप नेत्या विजया रहाटकर यांची घणाघाती टीका

मुंबई : प्रतिनिधी बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या, तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रियता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्वसुरक्षेसाठ स्वतःच कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून राहायचे, असा …

Read More »