Breaking News

Monthly Archives: December 2021

विरोधकांचे स्वप्नरंजन

2014 साली देशातील सत्ता काबीज केल्यानंतर भारतीय जनता पक्ष संघटनात्मक पातळीवर इतक्या वेगाने वाढला की विरोधीपक्ष पूर्णत: निष्प्रभ झाले. अध्यक्षपदी असताना अमित शहा यांनी पक्षवाढीचे हे अफाट काम केले. त्याउलट प्रभावी नेतृत्वाअभावी याच काळात काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय होत गेली. पक्षाच्या या अवस्थेमुळे आज हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. …

Read More »

कर्जत-पनवेल शटलसाठी भाजपचे पाऊल

सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव …

Read More »

ओबीसींचे अस्तित्व संपविण्याचा कट उघड

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाकरे सरकारवर आरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त काँग्रेस तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरूंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. हा …

Read More »

तामिळनाडूत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; देशाचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

चेन्नई, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी (दि. 8) तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. भारतीय वायुदलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. या दुर्घटनेत एकूण 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

अवकाळी पावसामुळे पांढर्या कांद्याची पुनर्लागवड करण्याची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांना पांढर्‍या कांद्याची पुनर्लागवड करावी लागली आहे. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजरात उशिरा येईल. अलिबाग तालुक्यातील कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या परिसरात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे 250 ते 300 हेक्टर पीक …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ साजरा

चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारणी सभा चौक सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक यांचा 2020 व 21 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत विशेष प्रावीण्याने उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पायावर भिंत पडूनही दोन वर्षीय मुलाचे वाचविले प्राण

साक्षी दाभेकरला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले अपंगत्व प्रमाणपत्र अलिबाग : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकर हिला बुधवारी (दि. 8) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. 22 जुलैच्या दरड दुर्घटनेत साक्षी हिने जीवाची पर्वा न करता दोन वर्षीय मुलाचे प्राण वाचविले होते. याबाबत …

Read More »

साईभक्तांची पेण-शिर्डी पदयात्रा

पेण : प्रतिनिधी पेण येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पेण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (दि. 7) ही दिंडी पेणमधून रवाना झाली आहे. या पदयात्रेत अनेक तरुण सहभागी झाले आहेत. यंदाचे संस्थेचे हे 6 वे वर्ष असून मंगळवारी सकाळी पेणमधील साईमंदिरात बाबांची आरती करून ही …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीच्या 58 उमेदवारी अर्जांपैकी 43 अर्ज वैध

पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या 17 प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलादपूर नगरपंचायतीच्या 4 नामाप्र प्रभागांमध्ये या वेळी निवडणूक होणार नसल्याने 14 उमेदवार आपोआपच रिंगणाबाहेर गेले आहेत. उर्वरित 14 प्रभागांतील 15 अर्ज अवैध झाल्याने …

Read More »

मुरूड-माझेरी रस्ता बनलाय जीवघेणा!

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील माझेरी रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत यामधून येत आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात, मात्र या रस्ताची अवस्था बिकट बनली आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास या खात्यातील …

Read More »