Breaking News

Yearly Archives: 2021

दीवाळीनिमित्त कलाकारांना व्यासपीठ

नगरसेविका राजश्री वावेकर यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय संस्कृती ही उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखली जाते. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृती एकमेकांना पूरक स्वरूपाच्या आहेत. सणांच्या निमित्ताने समाजातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते. अशा वेळी नगरसेविका राजश्री वावेकर यांनी कलाकारांना दिवाळीनिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध …

Read More »

इंग्लंडचा विजयी ‘चौकार’; बटलरचे शतक

शारजा ः वृत्तसंस्था यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने (67 चेंडूत नाबाद 101 धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर इंग्लंडने सोमवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकात श्रीलंकेवर 26 धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. सुपर-12 फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 19 षटकांत …

Read More »

चला धावूया आरोग्य जागरूकतेसाठी!; कामोठ्यात शुक्रवारी फन रन, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील छाबा फाऊंडेशनच्या वतीने 14 नोव्हेंबर रोजी 5 आणि 10 किलोमीटर पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करणे आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना पोषक अन्न आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने या रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण …

Read More »

भारताचा आज अफगाणिस्तानशी होणार सामना; सुपर-12 लढत

आबुधाबी ः वृत्तसंस्था सलग दोन पराभव पत्करलेल्या भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील सुपर-12मधील पुढील सामना बुधवारी(दि. 3) अफगाणिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकून विजयाचे खाते खोलण्यास उत्सुक असेल. वर्ल्डकपमध्ये भारताचा समावेश दुसर्‍या गटात आहे. या गटातून पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असून पाचव्या स्थानावरील भारताची निव्वळ धावगती फारच खालावलेली आहे. …

Read More »

मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत काळसेकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पनवेलमधील अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक महाविद्यालयात नुकतीच मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोफत लसीकरण अभियानांतर्गत सुमारे 100 विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा …

Read More »

सुरेश पोसतांडेल यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड

उरण : वार्ताहर सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. नगर परिषद, नगरपंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत. सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम …

Read More »

उरण येथे महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांची प्रदर्शन, विक्री

उरण : वार्ताहर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत, प्रेरणा व शिवसंग्राम महिला ग्रामसंघ केगाव आयोजित उरण नगर परिषदेच्या सहकार्याने महिला स्वयंसहायता समूह आणि महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाची जाहिरात आणि विक्री व्हावी हा उद्देश ठेवून दोनदिवसीय प्रदर्शन आणि विक्री मेळावा महिलांच्या उत्कर्षासाठी मेहनत घेणार्‍या जयश्री रमाकांत पाटील, प्रज्ञा सुधीर पारधी …

Read More »

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या दोघांना अटक

पनवेल ः वार्ताहर दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केले. याबाबत अधिक माहिती अशी की, हे आरोपी अल्पवयीन मुलींना घेवून भोसरी पुणे परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अपहरण मुलींच्या आईंना घेवून कामोठे पोलीस ठाण्याचे विशेष पथक सलग दोन दिवस त्या ठिकाणी …

Read More »

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर स्पा व्यवसाय चालविणार्‍या महिलेकडे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिच्याकडे खंडणीची मागणी करून न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणारा तोतया पोलीस अधिकारी इसमास खारघर पोलिसांकडून अटक करण्यात आली. यातील आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तशी वेशभूषा करून तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर व स्पाचे …

Read More »

अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या महिलेला अटक

पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुली व स्त्रियांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या एका महिलेस कामोठे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुली व तीन स्त्रियांची सुटका केली आहे. कामोठे परिसरात अल्पवयीन मुली व स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैशांसाठी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांनी एक …

Read More »