पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सध्या अनेक कारणांनी धूमसतोय. आधीच राज्यात शेतकर्यांचे प्रश्न, एसटी कर्मचार्यांचा संप यावर मार्ग काढण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याने अस्वस्थता पसरलेली असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटलाय. निमित्त झाले ते त्रिपुरातील कथित घटनेचे. यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोर्चे निघाले आणि जे व्हायला नको होते तेच झाले. देशाच्या …
Read More »Yearly Archives: 2021
गडचिरोलीत तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी (दि. 13) झालेल्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलविण्यात आले आहे. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप …
Read More »माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न घेऊन भाजपचे शिष्टमंडळ राजधानी दिल्लीत
कर्जत ः बातमीदार माथेरान शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन माथेरानमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री, तसेच केंद्रीय भूपृष्ठमंत्री यांची भेट घेऊन माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. भाजप नेते व जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि …
Read More »अण्णा हजारेंचा एसटी कर्मचार्यांच्या संपाला पाठिंबा
नगर ः वृत्तसंस्था राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचार्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो, तरी कर्मचार्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचार्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी अण्णांनी …
Read More »काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
बंगळुरू ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणार्या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेलेय ते म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज यांचे. प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. …
Read More »शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण
ठाणे ः प्रतिनिधी भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक …
Read More »अमरावतीत आज कडकडीत बंद; जमाव आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज
अमरावती ः प्रतिनिधी राज्यात शुक्रवारी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांमधून हिंसाचार उसळल्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने शनिवारी (दि. 13) बंदची हाक दिली होती. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जनक्षोभ उसळून जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्रिपुरा राज्यात झालेल्या कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 …
Read More »शोएब मलिकचे अभिनेत्रीसोबत फोटोशूट
लाहोर ः वृत्तसंस्था सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर आणि शोएब मलिकच्या हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे. आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री असून पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि शोएबने फोटोशूट केले आहे. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरू आहे. शोएब मलिक भारताची …
Read More »चला धावूया आरोग्य जागरूकतेसाठी! कामोठ्यात आज फन रन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील छाबा फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 14) बालदिनानिमित्त 5 आणि 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करणे आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना पोषक अन्न व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने या फन रनचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठे …
Read More »’कमळ’चा ग्राहक दिन साजरा
अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग या संस्थेच्या वतीने नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे कामकाज 13 शाखांमार्फत चालते, संस्थेच्या सर्व शाखांमधून येणार्या ग्राहकांसोबत हितगुज करावे, त्यांना संस्थेकडून भविष्यात हव्या असणार्या वा अपेक्षित असणार्या सेवा याबाबत चर्चा व्हावी हाच हेतू ठेवून संस्थेने गुरुवारी (दि. 11) हा …
Read More »