Breaking News

Yearly Archives: 2021

खालापूर नगरपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा

नऊ महिने लोकप्रतिनिधींशिवाय कारभार खोपोली : प्रतिनिधी कोरोनामुळे मुदत संपल्यानंतरदेखील निवडणूक होऊ न शकल्याने खालापूर नगरपंचायतीचा कारभार गेल्या नऊ महिन्यांपासून लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे. खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षाचा कालावधी जानेवारी 2021 मध्ये पूर्ण झाला. तत्पूर्वी नोव्हेंबर 2020मध्ये नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे होती. राजकीय …

Read More »

पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांची बदली

पोलादपूर : प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांची सातारा येथे बदली झाली आहे. पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामधील कर्मचार्‍यांनी त्यांना नुकताच निरोप दिला, त्या वेळी धुमाळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कैलास धुमाळ हे गेल्या तीन वर्षांपासून पोलादपूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. महाड उपविभागीय कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

कर्जत : बातमीदार अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर), पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ, मुंबई), तसेच माथेरान नगर परिषद व स्थानिक अश्वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील टेनिस कोर्ट येथे घोड्यांची आरोग्य तपासणी आणि नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 16 घोड्यांची …

Read More »

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे गणेशोत्सवात नियमांचे पालन करा, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी बुधवारी (दि. 1) खालापूर येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालापूर येथील नेताजी पालकर सभागृहात बुधवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी …

Read More »

सुपारी संघाकडून मिळतोय अनेकांना रोजगार

कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. उंच उंच नारळ-सुपारीची झाडे आणि निळाशार समुद्रकिनारा. या सृष्टीसौंदर्यामुळे वर्षाला लाखो पर्यटक कोकणच्या सागरीकिनार्‍याला भेट देत असतात. सुपारीची उंच झाडेसुद्धा पर्यटकांना आकर्षित करीत असतात. श्रीवर्धन व मुरूडसारख्या भागात रोठा नावाची नावाजलेल्या सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. या सुपारीला जगभरातून मोठी मागणी आहेे. वर्षाला एकदाच …

Read More »

घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धा पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक 14, 18, 19 व 20 करिता मर्यादित असून स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात …

Read More »

गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली

पनवेल ः वार्ताहरगणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची पावले बाजाराकडे पडताना पहावयास मिळत आहेत.गोकुळाष्टमीपासून पूजेच्या साहित्याची खरेदी जोमाने सुरू झाली आहे. पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोड्याफार प्रमाणात भाववाढ झाली आहे, मात्र याचा परिणाम खरेदीवर होताना दिसत नाही. …

Read More »

अनिल परबांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच! -सोमय्या

कणकवली ः प्रतिनिधीराज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे दिले. सोमय्या यांनी प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार …

Read More »

शार्दुल ठाकूरचे जलद अर्धशतक; सेहवागला टाकले मागे

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. शार्दुलने 36 चेंडूत सात …

Read More »

प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि …

Read More »