Breaking News

Monthly Archives: January 2022

सर्वांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे; पनवेलमध्ये विविध सुविधांचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आग्रही झाले पाहिजे. सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) येथे केले. ते विकासकामांच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक-नगरसेविका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध …

Read More »

राज्यात कडक निर्बंध लागू

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. सरकारच्या नव्या नियमावलीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार राज्यात दिवसा जमावबंदी जाहीर करण्यात आली असून पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच …

Read More »

आजपासून देशात बूस्टर डोस लसीकरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशभरात सोमवार (दि. 10)पासून पात्र व्यक्तींना बूस्टर (प्रिकॉशन) डोस देण्यात येणार आहे. या संदर्भातील तयारी आरोग्य विभागाने केली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्या व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात …

Read More »

शेवटच्या कसोटीत रॉस टेलर झाला भावूक

ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशविरुद्ध ख्राइस्टचर्चच्या मैदानावर उतरला. या वेळी टेलर खूपच भावूक झाला. नाणेफेकीनंतर राष्ट्रगीत सुरू असताना टेलरचे डोळ्यांत पाणी आले आणि तो शेवटपर्यंत आपले अश्रू रोखू शकला नाही. टेलरचा भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलरने …

Read More »

लोणशीतील स्पर्धेत एमसीसी तळा संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील एव्हरग्रीन  क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला आयोजित  मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत एमसीसी क्रिकेट क्लब मेठ मोहल्ला तळा संघाने अंतिम सामन्यात साई क्रिकेट संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांकाचे बक्षीस महेर एलेव्हन टेमपाले संघाने जिंकले. उत्कृष्ट फलंदाज …

Read More »

मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे सावट

मुंबई ः प्रतिनिधी राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. 2004 सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसर्‍या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठ्या जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू …

Read More »

ब्रॉड-अँडरसनने इंग्लंडला तारले; अटीतटीची चौथी कसोटी अनिर्णीत

सिडनी ः वृत्तसंस्था अत्यंत रंगतदार झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या शेवटच्या विकेटचा बचाव करीत ऑस्ट्रेलियाचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. सिडनीत झालेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने 388 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि …

Read More »

म्हसळा मार्केटमध्ये ओल्या हळदीचे आगमन

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा मार्केटमध्ये सध्या ओल्या हळदीचे आगमन झाले असून या हळदीकडे सर्वच जण आकर्षित होत आहेत. ग्राहक आलं-मिरची घेण्यासाठी जातो तेव्हा तिथे आल्याच्या शेजारी आल्यासारखीच दिसणारी ओली हळद आपलं लक्ष वेधून घेते. ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश …

Read More »

रेल्वेस्थानकावर तुटलेल्या फरशीमुळे प्रवासांचा जीव धोक्यात

कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वेस्थानकावरील फलाटावर फरशीचे टोक बाहेर आल्याने प्रवाशांना दुखापत होऊ शकते. याबाबतीत रेल्वे प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्जत येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कर्जत रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक झाड आहे. त्या झाडाच्या जवळ फरशा …

Read More »

चौलमध्ये पुन्हा लसीकरण मोहिमेला प्रारंभ

रेवदंडा : प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार चौल मुखरी गणपती मंदिर सभागृहात लसीकरणाला शुक्रवारी (दि. 7) सुरुवात झाली आहे. हे लसीकरण चौल अश्विनी रुणालय, चौल ग्रामपंचायत यांच्या अथक परिश्रमाने होत आहे. चौल ग्रामपंचायतीच्या वतीने अश्विनी रुग्णालय चौल यांचे सहकार्य व परिश्रमाने यापूर्वी चार हजार लसीकरणाची पूर्तता झाली आहे. त्या वेळी चौल तसेच …

Read More »