Breaking News

Monthly Archives: January 2022

साई येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकांच्या भले करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 22) केले. पनवेल तालुक्यातील साई येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाले. त्या …

Read More »

मुंबईत इमारतीला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, 15 जखमी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील ताडदेव भागातील एका इमारतीला शनिवारी (दि. 22) सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताडदेवमधील नाना चौकातील गांधी रुग्णालयाच्या समोरील 20 मजली कमला बिल्डिंगला शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग आग …

Read More »

टाटा रुग्णालयात प्रोटॉन थेरपीची चाचणी

खारघर : प्रतिनिधी कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या दुसर्‍या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी शुक्रवारी (दि.21) रोजी यशस्वी झाली. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने शेकडो रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार …

Read More »

मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी वाचन करणे गरजेचे -डॉ. कळमकर

पनवेल : प्रतिनिधी भाषा ही लवचिक असून, भाषा भावना व्यक्त करणारी असते, पण आता इमोजी वापरले जातात. प्राचीन काळातील लोक जशी चिन्हाची भाषा वापरत होते, तसे आपण पुन्हा मागे जातो की काय असे वातावरण तयार होऊ लागले आहे. मराठी भाषा वृध्दीगंत करायची असेल तर वाचन केले पाहिजे वाचनालयातील पुस्तके वाचकांची …

Read More »

उरणमध्ये डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्याच्या विल्हेवाटसाठी प्रकल्प

उरण : वार्ताहर उरण शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगर पालिकेने बायो मायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले. बोरी पाखाडी येथिल डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात 2007 पासून साठलेल्या कचर्‍याचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे …

Read More »

मोबाइल चोरी, फसवणुकीच्या घटनांत वाढ

पनवेल, उरण, नवी मुंबईत सराईत चोर अटकेत पनवेल : वार्ताहर पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात चोरीच्या व फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत सराईत चोरांनी दहशत माजवली आहे. नागरिकांना लुटणे, मोबाइल चोरणे, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

पटोले, कसे पटवले?

नाना पटोले यांनी दावा केलेल्या मोदी नावाच्या कथित गावगुंडाला नागपूरमध्ये एका वकिलाने प्रसारमाध्यमांसमोर उभे केले खरे, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना या कथित गुंडाची बोबडी वळली. पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत असा दावा त्याने केला असला तरी, मोदींसंदर्भात पटोलेंनी केलेली दर्पोक्ती अंगलट येऊ लागल्याने उगाचच कुणाला तरी …

Read More »

पनवेल प्रभाग क्रमांक 19मध्ये राबविली स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 21) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल …

Read More »

24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

‘दिबां’च्या नावासाठी कृती समितीचा वज्रनिर्धार पनवेल : हरेश साठे आता बस पुरे झाले! ‘दिबां’च्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करीत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतही सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 21) काढला असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळांची घंटा 24 जानेवारीला वाजणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना …

Read More »