सुदैवाने एकाचाही मृत्यू नाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत दुपटीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही ही समाधानाची बाब आहे. डिसेंबर महिन्याच्या …
Read More »Monthly Archives: January 2022
सहजसेवा निसर्ग शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
खालापूर : प्रतिनिधी सहजसेवा फाउंडेशन या संस्थेने खालापूर तालुक्यातील महड येथे वीटभट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी निसर्ग शाळा सुरू केली आहे. वावोशी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रदीप नथुराम पाटील यांनी या शाळेतील मुलांची रविवारी (दि. 2) वैद्यकीय तपासणी केली. सहजसेवा फाउंडेशनच्या निसर्ग शाळेच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था …
Read More »बोर्ली बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त; महसूल खात्याची कारवाई; इतर अनधिकृत बांधकामेही पाडणार
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ली एसटी बसस्थानक परिसरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणे महसूल विभागाने जमीनदोस्त केली. या परिसरातील अन्य बेकायदेशीर बांधकामे हटवून ही जागा महसूल विभाग ताब्यात घेणार आहे. बोर्ली एसटी स्थानक परिसरातील गट क्रमांक 65 या सरकारी जागेत स्थानिक लोकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. बोर्ली स्थानक परिसरातील सरकारी जागेवर झालेली …
Read More »कर्जत-मुरबाड मार्ग मृत्यूचा सापळा!; रात्रीचा प्रवास धोकादायक
कर्जत : प्रतिनिधी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कर्जत-मुरबाड या मार्गाचे काँक्रीटीकरण करीत आहे, मात्र हे काम सलग न करता अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग अर्धवट सोडण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहेत. दरम्यान, या मार्गावरील अर्धवट असलेल्या कामांच्या ठिकाणी ‘रस्ता बंद …
Read More »कोणी क्रीडांगण देता का? क्रीडांगण…
महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या तालुक्यात एकही क्रीडांगण नाही, ही तर शरमेची बाब म्हणावी लागेल. महाडमध्ये मुलांना खेळण्यासाठी असलेल्या दोन मैदानापैकी एक चांदे मैदान आणि दुसरे भिलारे मैदानही ऐन पावसाळ्यात चिखल आणि गवताने व्यापले जाते. यातील भिलारे मैदानाकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने या मैदानावर उनाड तरुणांचा वावर वाढला …
Read More »वर्षारंभीही चिंता कायम
जुने वर्ष सरून नवे वर्ष सुरू झाले आहे. यंदा नववर्षाच्या स्वागताचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. याचे कारण दुसरे तिसरे काहीही नसून कोरोना हेच आहे. गेली दोन वर्षे या वैश्विक महामारीने जगभर वाताहत केली असून हे संकट थांबायचे नाव घेत नाहीए. उलट नवनवी रूपे घेऊन कोरोना डोके वर काढत आहे. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून व प्रमुख उपस्थितीत शाळा आणि अंगणवाडीचे उद्घाटन
पनवेलमधील मोहोत नामफलकाचेही अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील मोहो येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, तसेच मोहोचा पाडा येथे अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या शाळा आणि अंगणवाडीचे उद्घाटन रविवारी (दि. 1) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »पनवेल मनपाची टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा; स्वच्छ सर्वेक्षण 2022
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिकेतर्फे टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बनवलेली वस्तू ही टाकाऊ वस्तूपासून बनवलेली असावी. या वस्तूची टाकाऊ ते टिकाऊपर्यंतची माहितीसोबत पाठवावी. या स्पर्धेसाठी 10 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. …
Read More »आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवार (दि. 3)पासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नवीन वर्षात केंद्र सरकार देशातील मुलांसाठी लसीकरण सुरू करीत आहेत. सुरुवातीला 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी …
Read More »‘…तर आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो’
न्यूयॉर्क : ‘आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर कोरोनाचे संकटदेखील नष्ट करू शकू. कोरोना साथीच्या तिसर्या वर्षात प्रवेश करीत असताना मला विश्वास वाटतोय की, याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी,’ असे जागतिक आरोग्य …
Read More »