Breaking News

Monthly Archives: January 2022

आपली सोसायटी आपली जबाबदारी; पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीत स्वच्छता अभियान

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील सोसायटी मित्र मंडळ आणि हॅप्पी मॅन गु्रपच्या वतीने ‘आपली सोसायटी आपली जबाबदारी’ या भावनेतून रविवारी (दि. 2) स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान जॉगिंग ट्रॅक आणि ग्राऊंडची साफसफाई करण्यात आली. या वेळी …

Read More »

विहीघर येथील कुस्ती स्पर्धेत बाळू बोरखेने जिंकली मानाची गदा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विहीघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते, तसेच या कार्यक्रमांदरम्यान कुस्त्यांच्या दंगलीचे (स्पर्धेचे) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक येथील …

Read More »

शिरढोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मोनाली घरत बिनविरोध

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी (दि. 2) झाली. यात भारतीय जनता पक्षाच्या मोनाली रोशन घरत यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल केळवणे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच मोनाली घरत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक …

Read More »

घोटाळेबाज नेत्यांचा निकाल लावणार; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. घोटाळेमुक्त महाराष्ट्र सरकार, असा संकल्प सोमय्या यांनी नववर्षानिमित्त केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, 2022 मधील संकल्प काय …

Read More »

नववर्ष, वीकेण्डला पालीत पर्यटकांचाही ओघ वाढला

रोजगाराला मिळाली चालना पाली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी शनिवारी व रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. तसेच सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे, लेण्या, स्तूप व अन्य पर्यटनस्थळी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. …

Read More »

रायगडातील पहिले स्किल हब नेरळमध्ये

कर्जत : बातमीदार देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून आठ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्किल हब उभारले आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिले स्किल हब नेरळ येथे उभारण्यात येत असून त्याची सुरुवात रायगड जेएसएमने पुढाकार घेऊन केली आहे. कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यत …

Read More »

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचाच्या वतीने महाडमध्ये महिलांच्या आंडरआर्म स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पंचायत समिती महिला संघ विजेता झाला. महिलांना विविध व्यासपीठ मिळवून देणारे डॉ. दिगंबर गिते यांच्या वेदा जनजागृती या सामाजिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 2) महाड येथील भिलारे मैदानावर महिलांच्या आंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

‘रोटरी’तर्फे स्वच्छता मोहिमेतून नववर्षाचे स्वागत

अलिबाग : प्रतिनिधी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिम राबवित केली. या वेळी त्यांनी अलिबाग समुद्रकिनारी क्रीडाभुवन येथे कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला अलिबाग शहरातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून शनिवारी नवीन वर्षाची सुरवात स्वच्छता मोहिमेतून करायचा निर्धार डॉ. …

Read More »

महड ‘गुरचरण’ला अतिक्रमणाचा विळखा

प्रशासनाचे दुर्लक्ष; तक्रारी करूनही कारवाई नाही, स्थानिकांना आरोप खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र महड हद्दीतील गुरचरण जागेत झालेले अतिक्रमण त्यामुळे भविष्यात महडच्या विकासाला बाधा येणार आहे. अनेकदा तक्रारी उपोषण करूनसुद्धा ठोस कारवाई झालेली नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड गावातील गुरचरण जागेची …

Read More »

कर्जतमध्ये मशाल मिरवणूक; हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये हुतात्मा स्मृती समितीच्या वतीने मशाल मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील माजी सैनिकांनी आपले अनुभव सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे …

Read More »