Breaking News

Monthly Archives: January 2022

अलिबागचा पांढरा कांदा अडचणीत; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार

अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा  पांढरा कांदा सध्या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसामुळे पिकाची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकरी …

Read More »

पेणमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

पेण : प्रतिनिधी येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील डीएलएलई युनिट, एनएसएस युनिट व पेण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गुगल मीट वर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. धारप यांनी प्रास्ताविकात  निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली. महाविद्यालयातील डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट तर्फे महाविद्यालयात निबंध स्पर्धा, …

Read More »

महाडमध्ये पर्यटन, मतदार दिन साजरा

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील गंधारपाले येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत पर्यटन आणि मतदार जनजागृती करण्यात आली. महाड महसूल विभाग, पंचायत समिती, गांधारपाले ग्रामपंचायत यांच्या संयुक्तवतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक पर्यटन दिन, मतदार दिन आणि मराठी भाषा दिन यांचे औचित्य साधून महसूल विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत …

Read More »

भाजपचे कै. राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट

महाड : प्रतिनिधी माजी नगरसेवक तथा भाजपचे दिवंगत नेते राजेय भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 29) महाड ग्रामीण रुग्णालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आला. या वेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेय आत्माराम भोसले यांच्या  दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त त्यांची पत्नी निलीमा भोसले आणि राजेय भोसले प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी महाड ग्रामीण …

Read More »

अलिबागमध्ये आदिवासी कातकरी बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटप

अलिबाग : जिमाका शासन आणि जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी (दि. 29) कुरूळ येथे केले. कातकरी उत्थान अभियानांतर्गत कुरुळ (ता. अलिबाग) ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी …

Read More »

नांदगाव मराठी शाळेतील डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील मराठी प्राथमिक शाळा नं.1 मध्ये डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन सरपंच वैशाली विनोद पवार व उपसरपंच अस्लम हुसेन हलडे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर क्लासरुमचे काम करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका या वेळी उपस्थित होत्या. शाळा …

Read More »

एसटीअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान; महाड-सांदोशी बस सुरू करण्याची पालकांची मागणी

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरात असलेल्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एकही एसटी बस गेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. एसटीने उपलब्ध कर्मचार्‍यांच्या सहकार्याने या भागात बसची एक फेरी सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्याप सुरूच असल्याने दुर्गम, खेड्यापाड्यातील ग्रामस्थांचे मोठे हाल …

Read More »

रायगडातील शाळा सोमवारपासून होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा येत्या सोमवार (दि. 31) पासून वाजणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शाळा सुरू करण्याला मान्यता दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी …

Read More »

‘दिशा’तर्फे गरजूंना सायकल प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील दिशा महिला मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन खालापूर येथील देवशेतवाडी येथून लांब शाळेत चालत जाणार्‍या मुलांना सायकल देऊन साजरा झाला. आपल्या मुलांच्या वापरात नसलेल्या  सायकल रिपेअर करून गरजू मुलांना प्रवास करण्यासाठी तसेच त्या चिमुकल्या जीवांना उन्हा-पावसात शाळेत जाण्यासाठीचा होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने 13 …

Read More »

पनवेलमध्ये वाडीधारकांना जलउपसा सिंचन साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टीलायझर अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशनमार्फत पनवेल तालुक्यातील 37 वाडी धारकांना जल उपसा सिंचनासाठी साहित्य वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे मुख्य उद्धिष्ट हे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे व कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधने हे आहे. दीपक फर्टिलायझर प्लांटचे हेड राधेश्याम शिंग, कंपनीचे …

Read More »