Breaking News

Monthly Archives: February 2022

टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव

विंडीजविरुद्धची मालिका अडचणीत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन, नवोदित ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर यांचा अहवाल सकारात्मक आला आहे तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी …

Read More »

भारताची फायनलमध्ये धडक

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले अँटिग्वा ः वृत्तसंस्था आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये धडक दिली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने 96 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान …

Read More »

चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर यांना मानवंदना

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) उंबरखिंड विजयोत्सव दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख यांनी सरनौबतांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रचिती देशमुख, जिया देशमुख, सलोनी पाटील, जिज्ञा शिंदे व प्राची जाधव …

Read More »

नेरळ धरणाची स्वच्छता करावी; सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांची मागणी

कर्जत : बातमीदार नेरळ येथे कल्याण-कर्जत रस्त्याला लागून असलेल्या ब्रिटिशकालीन धरणामध्ये प्लास्टिक कचरा आणि पिशव्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे धरणातील गणेश घाटाच्या बाजूला उकिरडा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या धरणाची स्वच्छता करावी आणि धरणाभोवती वॉकिंग ट्रॅक उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी केली आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे …

Read More »

महाडमध्ये 10 वर्षे अत्याचार करणार्‍यांवर दोन वर्षांनी गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी विवाहितेवर हुंड्यासाठी गेली दहा वर्षे अत्याचार करणार्‍या सासरच्या लोकांविरोधात पीडित महिलेने सन 2020मध्ये तक्रार केली होती, त्यांच्यावर गुरुवारी (दि. 3) महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेचा विवाह 13 मार्च 2010 रोजी विनेश सुदाम गायकवाड (रा. काकरतळे, महाड) याच्याशी रितीरीवाजाप्रमाणे झाला होता. नवरदेवाला मुलीच्या …

Read More »

वढाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वढाव ग्रुपग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मानांकन संस्थेचे मुख्य लेखापाल किरण भगत यांच्या हस्ते वढाव संरपच पूजा पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, ग्रामसेवक कुंभार यांनी हे प्रशस्तीपत्र स्वीकारले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेश वर्तक, पोलीस पाटील कविता म्हात्रे, समाजसेवक अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ या वेळी …

Read More »

महडमध्ये कोरोना नियम पाळून होणार माघी गणेशोत्सव

खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी महड येथील श्री वरदविनायकाची पूजा बुधवारी (दि. 2) देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या हस्ते केल्यानंतर मंदिरातील माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा माघी गणेशोत्सव यंदाही कोरोनाविषयक सर्व नियम पाळून साजरा होत आहे. महड येथील श्री वरदविनायक मंदिरातील माघी गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे …

Read More »

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची शिवसेनेला घाई

पनवेल : प्रतिनिधी चिरीमिरीच्या नादात खोटे आरोप करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहेत, त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने शिवसेनेला पिवळे होण्याची घाई लागली आहे. असा सणसणीत टोला घोट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद पाटील यांनी शिवसेनेच्या कथित आरोपावर लगावला आहे. घोट गावातील जमिनी संदर्भात बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा यांच्यावर आरोप करताना कार्यसम्राट लोकप्रिय …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना ऑनलाइन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी ऑनलाइन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळणार आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. 3) झालेल्या सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला. या वेळी महापालिका हद्दीत नवीन पाईप लाईन टाकणे, पाईप लाईन बदलणे व इतर कामे करण्यासही मंजुरी देण्यात आली. महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा गुरुवारी मुख्यालयातील …

Read More »

वाईनबाबतचा निर्णय मागे घ्या! – बंडातात्या कराडकर

राज्य सरकारविरोधात आंदोलन सातारा : प्रतिनिधी राज्य सरकारने सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. सातर्‍यात बंडातात्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत वाईन विक्रीबाबतचा निर्णय …

Read More »