Breaking News

Monthly Archives: February 2022

पनवेल तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर पनवेल तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि. 2) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी युवकांनी नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार विषयक व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा …

Read More »

पनवेलमधील वेश्यांवर कारवाई करण्याची मागणी

नगरसेविका दर्शना भोईर यांचे पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजुच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वेश्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कादबाने यांना निवेदन दिले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. …

Read More »

उरण मार्गावर स्टेशन बांधकामांना वेग

नागरिकांकडून आनंद व्यक्त उरण : रामप्रहर वृत्त जासई, रांजणपाडा, जेएनपीटी (नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) व उरण शहर या रेल्वे स्थानकांच्या बांधकामांना वेग आला आहे. स्थानकात फलाटे तयार झाली असून रेल्वे मार्गही बसविण्यात आले आहे. यातील रांजणपाडा स्थानकाच्या छपराचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरणमध्ये रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिक …

Read More »

फणसाड अभयारण्यात जाळरेषा काढण्यास वेग; विहूर आदिवासीवाडीतील तरुणांची मदत

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्य आगीपासून सुरक्षित रहावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे. या कामात विहूर आदिवासी वाडीतील तरुण मदत करीत आहेत. मुरूड तालुक्यातील सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. या अरण्यात वन्यजीवांसह असंख्य पक्ष्यांच्या जाती …

Read More »

कार्ले गावात गोळ्या येतातच कशा?

अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलिसांच्या गोळीबार सरावावेळी डोंगरापलिकडील कार्ले गावात बंदुकीच्या गोळ्या येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यात अशीच घटना घडली. एक गोळी घराच्या छपरातून आत आली. या घटना आता कार्ले गावाला नवीन राहिलेल्या नाहीत. या गोळ्यांमुळे कुणी जखमी झालेला नाही. वास्तविक पाहता परहूर आणि कार्ले या दोन गावांच्यामध्ये …

Read More »

खो-खो संघ होणार 15 खेळाडूंचा

मुंबई ः प्रतिनिधी भारताच्या पारंपरिक खो-खो क्रीडा प्रकारात संघात्मक पातळीवर बदल करण्याचे भारतीय खो-खो महासंघाने ठरवले आहे. त्यानुसार आता एप्रिलमध्ये सुरू होणार्‍या नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघांत 12 ऐवजी 15 खेळाडूंच्या समावेशाला मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपासून होणार्‍या सर्व स्पर्धांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, …

Read More »

‘तो’ झेल सोडल्यानंतर दोन दिवस झोपला नव्हता हसन अली

कराची ः वृत्तसंस्था गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षकरित्या पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यात महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने क्षेत्ररक्षणात चूक केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला. वेडनेच ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहचवले. सामन्यानंतर हसन अलीली चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात …

Read More »

बोपण्णा-रामनाथन जोडीची विजयी सलामी

टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा पुणे ः प्रतिनिधी रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली. बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान 6-3, 3-6, 10-7 असे परतवून लावले. युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला …

Read More »

हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नाही -शार्दुल ठाकूर

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरची वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली असून तो अहमदाबादला पोहचला आहे. शार्दुल स्वत: अष्टपैलू खेळाडू असल्याचे मानतो तसेच हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नसल्याचेदेखील त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. ‘मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. जेव्हा जेव्हा मला …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात पुण्याचा मुंबईवर विजय

प्रो कबड्डी लीग बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी पुणेरी पलटण आणि यू मुंबा या महाराष्ट्राच्या दोन संघांत अटीतटीचा सामना पहायला मिळाला. यात पुण्याने मुंबईचा 36-34 असा पराभव केला आणि आठव्या विजयासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबईने संघाही या सामन्यातून एक गुण मिळवला. या सामन्यात पुणेरी पलटणने सामन्यात …

Read More »