Breaking News

Monthly Archives: February 2022

पेणमधील सोनखार रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून आत्तापर्यंत पाच कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून विकासकामांचा हा झंझावात यापुढेदेखील सुरू राहणार आहे, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी शनिवारी (दि. 5) दिली. आमदार रविशेठ पाटील …

Read More »

ट्रेडिंगचे प्रकार, त्याचा कालावधी आणि जोखीम

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com मागील लेखात ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल आपण जाणून घेतलं. आता ट्रेडिंगचे प्रकार आणि त्याच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्‍यांना स्काल्पर्स म्हणतात. मोठ्या प्रमाणात शेअर्स किंवा युनिट्सची लगेचच खरेदी-विक्री करून झटपट नफा-नुकसान पदरात पडून घेणार्‍यांस स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात …

Read More »

उद्याच्या अपरिहार्य बदलांचे दिशादर्शन करणारा अर्थसंकल्प!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com देशाच्या अर्थसंकल्पाकडे राजकीय आणि करसवलतीपुरता अर्थसंकल्प असे न पाहता, देशाच्या विकासाची येत्या काही वर्षातील दिशा म्हणून पाहिले तर काय दिसते? अर्थसंकल्प देशाला सर्वार्थाने जोडणारा तर आहेच, पण त्यात भारतीय अर्थव्यवस्था टेक ऑफ स्टेजला नेण्याची क्षमताही आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला जगाच्या व्यासपीठावर जी संधी निर्माण झाली आहे, …

Read More »

खांदा कॉलनीत पोळी भाजी, स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील श्रीकृष्णा गार्डन सोसायटी  येथे कुणबी समाज संस्था, पनवेल यांच्या महिला विभाग पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन श्री अन्नदा पोळी भाजी आणि स्नॅक्स कॉर्नर सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 4) माघी गणेशोत्सव दिनी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी …

Read More »

शिरढोणमध्ये गॅस गिझरचे वाटप

पनवेल : वार्ताहर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत वन्यजीव ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्या अंतर्गत ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण यांच्या वतीने शिरढोण ग्रामपंचायत हद्दीतील 76 लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानात गॅस गिझरचे वाटप करण्यात आले. शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. …

Read More »

गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या विशेष विषयनिहाय मार्गदर्शनपर व्याख्यानांची मालिका नुकतीच सुरू झाली. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे …

Read More »

गणेश जयंतीनिमित्त स्वच्छतेची जनजागृती

शून्य कचरा उपक्रम राबवून सामाजिक संदेश पनवेल : प्रतिनिधी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये पनवेल महापालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या विविध सभा, समारंभ थ्री आर संकल्पनेनुसार साजरे करण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात …

Read More »

पुन्हा त्याच चुका नकोत

ओमायक्रॉनने महामारीचा शेवट होईल अशी आशा सारेच बाळगून असले तरी काही तज्ज्ञ हा शेवट इतका सहज-सोपा नसेल असा इशाराही देत आहेत. श्रीमंत देशांमध्ये बूस्टर डोस आणि चौथी लसही दिली गेली असली तरी काही गरीब देशांमध्ये जेमतेम दहा टक्के लोकांचेच लसीकरण पार पडले आहे. ही असमानताच महामारीचा शेवट अवघड करणारी ठरणार …

Read More »

बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करा

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ …

Read More »

सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद

आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा परवडणार्‍या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड हा सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजने अंतर्गत …

Read More »