Breaking News

Monthly Archives: February 2022

माजी खासदार गजानन बाबर यांचे कोरोनाने निधन

मावळ : प्रतिनिधी शिवसेनेचे माजी खासदार आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले गजानन बाबर यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र बुधवारी (दि. 2) बाबर यांची प्राणज्योत मालवली. गजानन बाबर यांची कोरोना चाचणी …

Read More »

” सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकारांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी “

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी व जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे समीर चव्हाण यांना देण्यात आले आहे. मागणी संदर्भातील …

Read More »

मुंबईत भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले

मुंबई : प्रतिनिधी ‘पेगॅसेस’वरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. या वेळी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले. केंद्र सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून …

Read More »

पनवेलमध्ये जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त अमृत अभियानांतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) उद्घाटन करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे …

Read More »

पनवेल उसर्ली खुर्दचा शेकाप सरपंच लाच घेताना जाळ्यात

पनवेल : रामप्रहर वृत्त विकासकामाच्या मूल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेणारा उसर्ली गु्रप ग्रामपंचायतीचा शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच अतुल आनंद तांबे याला बुधवारी (दि. 2) रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे उसर्ली खुर्द परिसरासह पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेकापचा सरपंच अतुल तांबे याने …

Read More »

‘फ्रेंड्स ऑफ नेचर’कडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोहो-शिवकर-चिखले डोंगरावर असणार्‍या शिव भोलेनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा ध्यास फ्रेंड्स ऑफ नेचर या ग्रुपने घेतला आहे. सध्याची तरुणाई व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते, मात्र याला अपवाद ठरत फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना 208 वृक्षांचे रोपण …

Read More »

पिरकोनमधील स्मशान घाटाची डागडुजी

‘मैत्री कट्टा’तर्फे श्रमदान व स्वखर्चातून कार्य उरण : बातमीदार उरण तालुक्यातील पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर 11 येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या सर्व मित्र मंडळींच्या श्रमदानातून आणि स्वखर्चातून पिरकोन गावातील वैकुंठघाट (स्मशान घाट) डागडुजी करण्यात आली. या घाटावरच्या चित्ता पेटवयाच्या पोलादी खांबांच्या खालच्या ढासळलेल्या अवस्थेतील पिलर्स आरसीसी काँक्रीटचे बांधकाम करून त्याची डागडुजी …

Read More »

तळोजा भुयारी मार्गातील बंद दिवे सुरू करण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकातील पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. दरम्यान, तळोजा येथील भुयारी पादचारी मार्गातील विद्युत दिवे बंद असल्याने रात्री मार्गक्रमण करताना अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे बंद दिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. …

Read More »

भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : वार्ताहर भाजप युवा मोर्चा महापालिका सरचिटणीस केदार भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 1000 गोरगरिबांना अन्नदान, रस्त्यावरील गरिबांना ब्लँकेटचे वाटप असे विविध उपक्रम या वेळी राबविण्यात आले. केदार भगत यांनी कोरोना काळात अन्नधान्य वाटप, एन 95चे मास्क, रोग प्रतिकारक शक्तीच्या अर्सेनिक 30च्या गोळ्यांचे वाटप, …

Read More »

तात्पुरते 837 आरोग्यसेवक कार्यमुक्त

नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती …

Read More »