ईडीकडून मालमत्ता जप्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, तीन फ्लॅट, …
Read More »Monthly Archives: April 2022
खोपोली आत्करगाव येथील बंद कंपनीला आग; लाखोंचे नुकसान
खालापूर ः प्रतिनिधी खोपोलीतील अल्ट्रा लायब्रोटेरीज कंपनीला लागलेल्या आगीनंतर अवघ्या महिन्याभरात खालापुरातील आत्करगांव येथील डीपीसीएल केमिकल या मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीला बुधवारी (दि. 13) दुपारी अचानक आग लागली. या बंद कारखान्यात 400 च्या आसपास ड्रम केमिकल साठवण केला होता. तो संपूर्ण साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. धुराचे लोट चार …
Read More »नेरळमध्ये शांतता कमिटीची बैठक;ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन
कर्जत : बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना त्यांच्या विचारांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित करावीत आणि प्रबोधन करावे, असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी नेरळ येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या निर्देशांबद्दल माहिती देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित …
Read More »रोह्यात लिंगायत समाजाला दफनभूमीची आवश्यकता; शासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष
रोहे : प्रतिनिधी शहरासह वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगायत, जंगम, गुरव समाज मोठ्या प्रमाणात रहात असून समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी दफनभूमी नसल्याने समाज बांधवांना नाहक त्रास होत आहे. लिंगायत समाज बांधवांना गाव तिथे दफनभुमी असे शासनाचे परिपत्रक असतानाही शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने लिंगायत समाज …
Read More »रायगड जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी धडक
संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन अलिबाग : प्रतिनिधी संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत लावण्यात आलेली इन्व्हाईस क्लेमची अट रद्द करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या संगणक परिचालकांनी बुधवारी (दि. 13) रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रमध्ये काम करणार्या संगणक परिचालकांना सीएसी-एसपीव्ही …
Read More »द्रोणागिरी धरण तलावावरून अवजड वाहतूक सुरूच
बाधित शेतकर्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा उरण ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धरण तलाव क्र.2 वर शेतजमिनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने ही जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवाचे अस्तित्व …
Read More »चिरनेर-खारपाडा रोडवरील पात्रादेवी घाट धोकादायक
अवजड वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाईची नागरिकांची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रोडवर अवजड कंटेनर ट्रेलर आणि दगडाची खडी, ग्रीट अवजड वाहतूक करणार्या डंपरची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. त्या डंपर मधून ग्रीट, खडी नियमित पडत असल्याने इंद्रायणी डोंगराजवळील पात्रादेवी घाटात वाहनाचा अपघातास कारणीभूत ठरु शकते. मुंबई, ठाणे, नवी …
Read More »हिंदुत्व हा भाजपचा श्वास
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा आहे. राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पक्ष खूप आधीपासून मांडत असून हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »लाल मिरचीला महागाईचा तडका
तरीही घरगुती मसाला बनवण्याकडे गृहिणींचा कल उरण ः वार्ताहर लाल मिरची खरेदीसाठी सध्या उरण बाजारात मोठी लगबग पाहण्यास मिळत आहे. घरगुती तिखट, तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे. यंदा तुलनेने आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या 40 दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह काश्मिरी मिरचीच्या …
Read More »खासगी लसीकरण केंद्रामध्ये प्रिकॉशनरी डोस उपलब्ध
पनवेल ः प्रतिनिधी सर्व खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 18 ते 59 वर्षांवरील नागरिकांचे दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना प्रिकॉशनरी डोस 10 एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण हे केवळ खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. या लसीकरणाकरीता कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper