अलिबाग ः प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे बुधवारी (दि. 13) अलिबागमध्ये संविधान जागर यात्रा काढण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व …
Read More »Monthly Archives: April 2022
कत्तलीसाठी आठ जनावरे नेणारा टेम्पो पकडला; दोघांना अटक
महाड ः प्रतिनिधी कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून आणलेल्या आठ जनावरांची टेम्पोतून वाहतूक करणार्या दोघांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ बैल, एक टेम्पो व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. अब्रार सज्जाद खान (वय 54, रा. गोवंडी, मुंबई) व समीर अशोक पवार रा. गोडाळे महाड अशी अटक करण्यात …
Read More »‘आरसीएफ’कडून मच्छीमारांना मिळणार सुविधा
आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुरूड ः प्रतिनिधी आरसीएफ कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणार्या कोळी बांधवांना मूलभूत सुविधा देण्याबाबत आश्वासन दिल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजप आमदार रमेश पाटील यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रसायन व खतमंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेऊन मच्छिमारांना न्याय देण्याची मागणी केली होती. …
Read More »कर्जतमध्ये गॅस्ट्रोची साथ; अनेक जण रुग्णालयात
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात गॅस्ट्रोची साथ आली असून 20हून अधिक रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून खासगी रुग्णालयातदेखील रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती मिळताच नगर परिषद सतर्क झाली आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कडक ऊन पडत आहे. तापमानाचा पारा …
Read More »अलिबाग-रेवदंडा मार्गावर खासगी एसटी बसला अपघात; 16 जण जखमी
रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-रेवदंडा मार्गावर बागमळा येथे बुधवारी (दि. 13) सकाळी जेएसडब्ल्यू कंपनीची बस आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही बसचालकांसह एकूण 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरूड आगाराची एसटी बस रेवदंडामार्गे मुंबईकडे निघाली होती. ही …
Read More »पनवेल तालुक्यात शेकापला आणखी एक हादरा
जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपत प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी येत्या शुक्रवारी …
Read More »आर्मी, नेव्ही, एअरफोर्स प्रवेशासाठी खोपोलीत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर; सहजसेवा फाउंडेशनचा पुढाकार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सहजसेवा फाउंडेशन तर्फे खोपोलीतील लोहाणा हॉलमध्ये 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सैन्य दलातील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे कमांडर सचीन पवार हे शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार …
Read More »आंबेडकरी चळवळीची परंपरा लाभलेले कर्जत
मुंबईपासूनजवळ असलेल्या कर्जत तालुक्यात आंबेडकरी चळवळ प्रचंड वेगाने पसरली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार-विचार कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजातील तरुणांनी तात्काळ आत्मसात केले. नागपूरमध्ये धम्माची दीक्षा घेताना डॉ. बाबासाहेब यांच्यासमवेत कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते होते. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमध्ये प्रसिद्धीपासून लांब राहून आजही काम करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभामध्ये …
Read More »हुमगाव जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण
कर्जत : बातमीदार रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या सेवाभावी संस्थेने कर्जत तालुक्यातील हुमगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे लोकार्पण रोटरीच्या पदाधिकार्यांनी केले. कर्जत तालुक्यातील 21 गावांमध्ये रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या संस्थेने जलशुद्धीकरण संच, पोलिओ सर्जरी, शैक्षणिक साहित्य वाटप, सार्वजनिक शचालये बांधणे, आरोग्य शिबिरेे, बोअरवेल खोदणे, …
Read More »डिकसळ पाली वसाहतीमधील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती
कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाली नवीन वसाहत येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली होती. या शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीला यश आले असून ग्रामपंचायतीने शौचालयाची दुरुस्ती केली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेमुळे डिकसळ पाली नवीन वसाहत येथील नागरिकांची गैरसोय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper