भाजपने वेधले अधिकार्यांचे लक्ष नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभागाची पावसाळ्यापूर्वी नाले व गटार साफसफाई शिरवणे गाव व नेरुळ सेक्टर 1 परिसरात व्हावी या अनुषंगाने गुरुवारी नेरुळ ब विभाग अधिकारी नागराळे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार, विजय नाईक, अरुणा …
Read More »Monthly Archives: April 2022
उरणमध्ये पोलिसांची रंगीत तालीम
उरण : वार्ताहर सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी शिरसागर (पोर्ट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत बुधवार (दि. 27) सायंकाळी एसटी स्टँड चारफाटा उरण येथे जातीय दंगा काबू प्रतिबंधक योजनेची रंगीत तालीम पोलिसांकडून घेण्यात आली. दंगा काबू प्रतिबंधक योजनेमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील, दोन निरीक्षक, सहा सहाय्यक निरीक्षक/निरीक्षक, 25 …
Read More »जेएनपीए ठरले देशातील सर्वोत्तम बंदर
देशाच्या निर्यात वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण हे देशातील प्रमुख कंटेनर बंदर आहे. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकानुसार भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे हे बंदर ठरले आहे. लॉजिस्टिक कामगिरीवर आधारित निर्देशांक सूची नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये जेएनपीएला सर्वाधिक 84.61 अंक प्राप्त झाले व जेएनपीए भारतातील प्रमुख बंदरांच्या …
Read More »न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांवर जनतेचा विश्वास -विनायक पात्रुडकर
नेरळमध्ये संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याने पत्रकारांवर सत्य आणि विश्वासार्ह लिखाणाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी बुधवारी (दि. 27) नेरळ येथे केले. कर्जत प्रेस क्लबच्या वतीने नेरळ येथील जेनी ट्युलिप शाळेच्या प्रांगणात बुधवारी …
Read More »समाजात शांतता टिकविणे महत्त्वाचे
अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे प्रतिपादन माणगाव पोलीस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी उत्साहात माणगाव : प्रतिनिधी इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांतून हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव वाढून समाजात शांतता व बंधुत्वाचा संदेश दिला जातो, असे प्रतिपादन रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी माणगाव येथे केले. माणगाव पोलीस ठाण्यातर्फे …
Read More »कर्जतमध्ये आदिवासींचा आक्रोश मोर्चा
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार जागृत कष्टकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारुन आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कर्जतच्या आमराई पुलापासून निघालेल्या या आक्रोश मोर्चात जागृत कष्टकरी संघटनेच्या कार्याध्यक्षा नॅन्सी गायकवाड, …
Read More »मोर्यांच्या कामामुळे मुरूडमधील रस्त्याची कामे थंडावली
मुरूड : प्रतिनिधी नगरविकास खात्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मुरूडमधील रस्त्यांच्या कामांना वेग आला होता, मात्र शहरातील नवाबकालीन गटारे व मोर्यांची कामे सुरू झाल्याने सध्या रस्त्याची कामे थंडावली आहेत. मुरूड शहरातील रस्त्यांच्या कामासाठी नगर परिषदेला नगरविकास खात्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी तातडीने …
Read More »पेणमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास अटक
पेण : प्रतिनिधी शहरातील आर. के. वाईन शॉप या दुकानात गुरुवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या सूरज सरबजित सिंग (रा. कुंभारआळी, पेण) या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा साथिदार सुंदर मोरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवार पहाटेच्या सुमारास दोन चोरटे शहरातील आर. …
Read More »किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप
माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय माणगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 27) जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरची घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे घडली होती. आरोपी महादेव गजानन …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात नको
राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper