खोपोली : प्रतिनिधी खोपोली महोत्सवातील बुलराईडमध्ये अडकल्याने बारा वर्षाचा रुद्र मोरे हा गंभीर जखमी झाला होता, या प्रकरणात महोत्सवाचे आयोजक सावंत व बुलराईड ऑपरेटर अशा दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता, चौकशीनंतर अलीकडेच आयोजकाला अटक करण्यात आली आहे. उशिरा का होईना, आयोजक सावंत व एकास अखेर पोलिसांनी अटक केली मात्र …
Read More »Monthly Archives: April 2022
खोपोली यशवंत नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे ना. रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण
खोपोली : प्रतिनिधी शहरातील यशवंत नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे लोकार्पण गुरूवारी (दि.28)केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्याची संधी मिळाल्याचे मत ना. आठवले यांनी या वेळी व्यक्त केले. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंत नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारणीसाठी रायगड …
Read More »माणगावचे मुख्याधिकारी गायब; विकासकामे ठप्प
नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे 20 एप्रिलपासून आजतागायत कोणतीही सूचना गैरहजर असून मुख्याधिकारी गायब असल्यामुळे माणगावमधील विकासकामे तसेच नागरिकांची कामे ठप्प झाली असल्याचा आरोप नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवारी (दि.29) पत्रकार परिषदेत केला. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात …
Read More »सुक्या मासळीचे भाव वधारले
अगोटच्या बेगमीमुळे मागणीत वाढ, बाजारात आवक मात्र कमी पाली : प्रतिनिधी कोकणात सुक्या व ओल्या मासळीची वेगळीच क्रेज आहे. सुकी मासळी साठवण करण्यासाठी महिला अधिक आग्रही असतात. त्यातही पावसाळा जवळ आला असल्याने रायगड जिल्ह्यात अगोटीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. मागणी अधिक व आवक कमी …
Read More »‘रमजान महिन्यात राष्ट्रीय एकात्मता, सद्भावना वृद्धिंगत होते’
बेणसे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन पाली : प्रतिनिधी रमजान हा मुस्लीम समाजबांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना असून, या महिन्यात राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना वृध्दींगत होत असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 28) बेणसे येथे केले. बेणसे येथील मस्जिदमध्ये गुरुवारी सुर्यास्तानंतर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »रोहा भुवनेश्वरमधील रस्त्यांची दुरवस्था
नव्याने रस्ते बनविण्याची नागरिकांची मागणी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर गावातील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या दोन रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे दोन्ही रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी …
Read More »शिरगाव-महाड रस्त्याचे काम संथगतीने
दीड किमी अंतराला लागले तीन महिने, वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त महाड : प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या महाड-शिरगाव गावा दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरु असून अवघ्या दीड किमी अंतराच्या या कामास तीन महिने लागल्याने रस्त्याशेजारील ग्रामस्थ आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरालगत असलेल्या या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीदेखील दुर्लक्ष करत …
Read More »अंदाज समितीकडून अधिकार्यांची झाडाझडती
अलिबागमधील काचळी-पिटकिरी खारभूमी कामाची पाहणी अलिबाग : प्रतिनिधी विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसांच्या रायगड दौर्यावर आली होती. या समितीने राज्य शासकिय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. तसेच काही प्रकल्पांना भेटी दिल्या. काही योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळल्यामुळे समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्न-उपप्रश्न विचारून अधिकार्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे अधिकार्यांची भंबेरी उडाली. रणजित …
Read More »नवीन पनवेलमध्ये सुटीच्या दिवशी पर्यावरणपूरक बससेवा होणार सुरू
परिवहनच्या उपक्रमामुळे 60 ते 70 लाखांची बचत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पयार्वरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा प्रवास सुरू आहे. रविवारी सुटीच्या दिवशी फक्त विद्युत व सीएनजी बसमधून प्रवासी वाहतुकीच्या प्रयोग यशस्वी होत असल्याने आता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘नो डिझेल बस’चा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला …
Read More »उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंंतर्गत वर्षभरात 1 कोटी 62 लाख 72 हजारांचे वाटप
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत मार्च 2022पर्यंत एकूण 1,356 लाभार्थ्यांना वर्षभरात एक कोटी 62 लाख 72 हजार रक्कम देण्यात आली अशी माहिती नायब तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली. दरम्यान शासनाच्या गोरगरिबांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती …
Read More »