अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेल्या सात पर्यटकांचा काळ आला होता पण वेळ आली नसल्याने ते सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडत असलेल्या सात पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षक आणि एटीव्ही चालकांना यश आले आहे. पुणे येथून सूर्यकांत शिंदे, रोहित गाडगे, सतीश भुजबळ, अपेक्षा शिंदे, कावेरी भुजबळ आणि अजून दोन …
Read More »Monthly Archives: June 2022
‘पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे’
मोहोपाडा : प्रतिनिधी सुरू झालेल्या पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीत गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलीस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिले. रविवारी (दि. 19) खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर …
Read More »पनवेल महापालिका करणार वृक्षगणना
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वृक्षांची माहिती व नोंदणी असणे आवश्यक असल्याने पनवेल महापालिकेने प्रथमच वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणनेमुळे पालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करणे, त्यांची प्रजाती ओळखणे, त्यांचे स्थान मॅपद्वारे निश्चित करणे आणि त्यांचे छायाचित्र काढणे शक्य होणार आहे. वृक्ष सर्वेक्षणाचा तपशील महापालिकेच्या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाले येथे विविध विकासकामे
भाजप नेते रवी भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे व नळ पाइपलाइन टाकणे येथील विकासकामाचा शुभारंभ रविवारी (दि. 19) झाला. भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच नीराबाई सहदेव पाटील …
Read More »मोलकरणीचा मुलगा दहावीत अव्वल
प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र होतेय कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील झोपडपट्टीत राहून मोलमजुरी करणार्या एका महिलेच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 84.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे व पालकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. प्रशांत शांताराम शिंदे असे दहावीत सुयश प्राप्त करणार्या विद्यार्थ्याचे नाव …
Read More »रायगडात जलधारा बरसल्या; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम
अलिबाग ः प्रतिनिधी नाममात्र हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या, मात्र त्यात हवा तसा जोर नव्हता. त्यामुळे मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात 7 तारखेपासून मोसमी पाऊस पडण्यास सुरुवात होते. यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज …
Read More »मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा -खासदार प्रकाश जावडेकर
मिशन लोकसभा 2024साठी भाजप होतोय सज्ज! खोपोली ः प्रतिनिधी मिशन लोकसभा 2024साठी भाजप सज्ज होत असून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे केले. मावळ …
Read More »शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पेणमध्ये निदर्शने
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक पेण ः प्रतिनिधी प्रोटोकॉल सांगत पोलीस अधिकार्याला खुर्चीतून उठविल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात रविवारी (दि. 19) पेण येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकार्याची माफी मागावी, अशी मागणी …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान; भाजप वि. ‘मविआ’ लढत
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 20) मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. भाजपचे पाच, तर आघाडीचे सहा (शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन) उमेदवार मैदानात आहेत. विधान परिषदेसाठी …
Read More »आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान
मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले. या वेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कांबे येथील हभप बाळाराम महाराज कांबेकर, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास …
Read More »